बुर्ज खलिफावर झळकला किंग खानचा ‘जवान’ : बॉलिवूडचा किंग म्हणून ओळखला जाणार अभिनेता शाहरुख खान हा ‘पठाण’ सिनेमानंतर आता सध्या त्याच्या ‘जवान’ या आगामी सिनेमासाठी प्रचंड चर्चेत आहे.
‘जवान’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अटली कुमार यांनी केले असून या चित्रपटात शाहरुख खानसह नयनतारा व विजय सेतुपती हे मुख्य भूमिकेत आहेत. तसेच दीपिका, सान्या मल्होत्रा यांसारख्या अनेक अभिनेत्री या सिनेमामध्ये झळकल्या आहेत.
‘जवान’ या चित्रपटाचा ट्रेलर कालच रिलीज करण्यात आला. सिनेमातील कलाकारांच्या चाहत्यांनी देखील जवानच्या ट्रेलरला भरभरून प्रतिसाद दिला. या सिनेमाच्या ट्रेलरला एका तासातच मिलियनमध्ये व्ह्यूज मिळाले.
View this post on Instagram
भारतात जलवा दाखवल्यानंतर शाहरुख खानच्या २०,००० हून अधिक चाहत्यांच्या उपस्थितीत बुर्ज खलिफा येथे जवानचा ट्रेलर लॉन्च केला. जवानचा ट्रेलर दुबईच्या बुर्ज खलिफावर लॉन्च करून या जवानच्या टिमने मोठी घोषणा केली आहे. सकाळी १०:३० आणि रात्री ९:०० च्या दरम्यान हा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. यावेळी शाहरुखची संपूर्ण टिम तिथे उपस्थित होती.
या दरम्यान सिनेमातील जिंदा बंदा गाण्यावर शाहरुखने जोरदार नृत्य केले. याशिवाय चित्रपटातील ‘चलेया’ या गाण्याचे अरेबिक व्हर्जनही लाँच करण्यात आले. तसेच शाहरुख खानने या चित्रपटातील त्याच्या पाच वेगवेगळ्या लूकबद्दल सांगितले. तेव्हा शाहरुख खान म्हणाला की, “मी या चित्रपटासाठी टकला झालो आहे. मी माझ्या आयुष्यात यापूर्वी असं कधीच केलं नव्हतं. बघा, तुम्हा लोकांसाठी मी टक्कल झालोय, त्याचा आदर करा आणि चित्रपट पाहण्यासाठी जा नंतर अशी संधी मिळते की नाही सांगता येत नाही.”
या सिनेमाच्या ट्रेलरने आता प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचवली आहे. ‘जवान’ ७ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून हा सिनेमा हिंदी, तमिळ आणि तेलगू या भाषांमध्ये जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.