‘बादशाह’ ला बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध रॅपर म्हणून ओळखले जाते. बादशाह भारतातील पंजाबी गायक आहे. पंजाबी सिंगर म्हटले की बादशहाचे नाव तुमच्या डोळ्यासमोर आल्यावाचून राहणार नाही. त्याने आत्ता पर्यंत लग्नाच्या गाण्यान पासून ते पार्टी साँग पर्यंत सर्वीच गाणी गायली आहेत. त्याच्या गाण्यांचा आनंद तरुणाई मनमोकळेपणे घेत असते. बादशहा एक निर्माता देखील आहे.
‘दो दुनि पंज’ या पंजाबी चित्रपटाची त्याने निर्मिती केली आहे. २०१९ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होत. हॅरी भट्टी हे या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. वीरे दी वेडिंग या चित्रपटातील ‘तरीफा’ या गाण्यासाठी बादशहाला फिल्मफेअरचा बेस्ट प्लेबॅक सिंगर मेल या कॅटेगरीमध्ये नॉमिनेशन मिळाले होते. सध्या तो त्याच्या वयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत आहे. तो दुसऱ्यांदा लग्न करण्याचे बोलले जात आहे.
बादशाह अभिनेत्री ईशा रिखीसोबत बऱ्याच दिवसांपासून रीलेशनशिपमध्ये आहे. ते दोघेही एकमेकांना खूप दिवसांपासून डेट करत आहेत. परंतु याबाबत त्याने स्वतःहून काहीही माहिती दिली नसून त्याने या अफवांच खंडनही केलेलं नाही. गर्लफ्रेंड ईशा रिखीसोबत लग्न करण्याच्या बातम्या समोर येत असल्याने यावर त्याने त्याच्या सोशल मिडिया अकाउंट वरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्याने संताप व्यक्त केले आहे. तो असं म्हणतो कि, “प्रिय मीडिया, मी तुमचा आदर करतो, पण हे चुकीचं आहे. मी लग्न करत नाहीये. ज्याने कोणी हे वृत्त तुमच्यापर्यंत पोहोचवलं आहे, त्याला चांगला मसाला शोधण्याची गरज आहे, ”
बादशाहने यापूर्वी जस्मिन मासिहशी लग्न केले होते. त्यांनी २०१२ मध्ये लग्न केले असून २०१७ ला त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले. त्यांच्या मुलीचे नाव जेसेमी ग्रेस असे आहे. त्यांच्या लग्नाला ८ वर्ष झाले असता त्याचंघटस्पोट झालं मात्र ते वेगळे होण्याचं कारण अजूनही समोर आलेल नाही.