बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते हरीश मॅगन यांचे दिनांक १ जून रोजी निधन झाले. त्यांनी वयाच्या ७६व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत अत्यंत खळबळ माजली आहे. हरीश मॅगन हे मुंबईमधील जुहू येथे अॅक्टिंग अकॅडमी चालवायचे.
हरीश मॅगनहे ‘चुपके चुपके’, ‘खुशबू’, ‘मुकद्दर का सिकंदर’ आणि ‘शेरशाह’, ‘गोल माल’, ‘नमक हलाल’, ‘इंकार’ अश्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. ‘उफ ये मोहब्बत’ हा त्यांचा १९९७ मध्ये आलेला शेवटचा चित्रपट. या चित्रपटानंतर ते पुन्हा अभिनय करताना कधीही दिसले नाही. त्यांच्या मृत्यूचे कारण अजूनही समोर आलेले नसून त्यांची पत्नी व त्यांची मुले यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
CINTAA expresses its condolences on the demise of Harish Magon
(Member since JUNE. 1988)
.#condolence #condolencias #restinpeace #rip #harishmagon #condolencemessage #heartfelt #cintaa pic.twitter.com/qMtAnTPThX— CINTAA_Official (@CintaaOfficial) July 1, 2023
हरीश मॅगन यांचे शिक्षण एफ.टी.आय. आय. या माध्यमातून झाले असून ते १९८८पासून सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन या संघटनेचे सदस्य होते. त्यांच्या निधनाची बातमीची पोस्ट या संघटनेने त्यांच्या ट्विटरवरून शेअर केली आहे. “सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करते,” असं त्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
त्यामुळे सध्या सिनेसृष्टीत शोककळा परसली आहे, तसेच त्यांच्या चाहत्यांमध्ये देखील दुःखाचे वातावरण पसरले आहे.