बॉलिवूडचा किंग खानने अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘पठाण’ या चित्रपटातून त्याने कमबॅक करत तोच बॉलिवूडचा ‘बादशाह’ असल्याचे दाखवून दिले.
‘पठाण’ हा चित्रपट त्याच्या कारकिर्दीतील सर्वात जास्त हिट झालेला चित्रपट असून या चित्रपटाचं कलेक्शन जरी अभिनेता अमीर खान व प्रभास यांच्यापेक्षा कमी असले तरी देखील हा चित्रपट एका बाबतीत मात्र सर्वांवर भारी पडला आहे.
शाहरुख खान जवळपास चार वर्षाच्या ब्रेकनंतर ‘पठाण’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. चार वर्षानंतर देखील त्याच्या अॅक्टिंग मधला स्वॅग आणि जलवा अगदी पहिल्या सारखाच दिसून आला. त्याच्या चाहत्यांनी देखील त्याचा हा चित्रपट अगदी डोक्यावर उचलून घेतला. तसेच सलमान खानच्या कैमियोने देखील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
View this post on Instagram
मीडिया रिपोर्टनुसार ‘पठाण’ हा भारतातील रिलीजच्या पहिल्या विकेंडल सर्वाधिक कमाई करणारा पहिला चित्रपट. पठाण जेव्हा प्रदर्शित झाला होता तेव्हा तो ५००० स्क्रीनवर प्रदर्शित झाला होता. ‘पठाण’ नंतर चित्रपटांच्या यादीत ‘KGF चॅप्टर २’, ‘बाहुबली २’, ‘संजू’, ‘टायगर जिंदा है’, ‘सुलतान’, दंगल आणि ‘ब्रम्हास्त्र’ हे चित्रपट येतात.
७ सप्टेंबर रोजी शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रीव्यू प्रदर्शित झाला. यात शाहरुख खानचा कधीही न पाहिलेला लूक पाहायला मिळाला. या चित्रपटाच्या टीझरने सर्वांचीचं मनं जिंकली आहेत. त्याचे चाहते देखील हा चित्रपट पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत.
‘जवान’ नंतर शाहरुख राजकुमार हिरणी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘डंकी’ या सिनेमामध्ये दिसणार आहे.