बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. नुकताच रणबीरचा “ब्रह्मास्त्र” हा सिनेमा प्रचंड गाजला. ब्रह्मास्त्रच्या यशानंतर रणबीर आता त्याच्या आणखी एका आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी सज्ज झाला आहे.
दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्या “अँनिमल” या सिनेमामध्ये रणबीर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. संदीप रेड्डी वंगा यांनी या पूर्वी दिग्दर्शित केलेला कबीर सिंग या सिनेमानेही फिल्म इंडस्ट्रीत धुमाकूळ घातला होता. आगामी चित्रपटात रणबीरसह नॅशनल क्रश म्हणजेच दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना स्क्रीन शेअर करणार आहे. त्यांचा हा सिनेमा २०२३ मध्ये प्रदर्शित होणार असून रश्मिका मंदाना आणि रणबीर कपूर व्यतिरिक्त अनिल कपूर आणि बॉबी देओल देखील या सिनेमात झळकणार आहे.
अॅनिमल या सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात झाली आहे. रश्मिकाने नुकताच रणबीर सोबतचा शुटिंग करण्याचा अनुभव शेअर केला. शूटिंग दरम्यानचा सेटवरील अनुभव शेअर करत असताना तिने रणबीरच्या स्वभावाबद्दल सांगितले. आणि त्याचा स्वभाव पाहून तिला रडूच कोसळले.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत रश्मिकाने सांगितले की,”सेटवरचा नाश्ता करून मला कंटाळा आला आहे. सेटवरचे जेवण फारसे चविष्ट नसल्याने मला ते आवडत नव्हते, परंतु नाइलाज होता. मी एकदा गप्पा मारताना रणबीरला सांगितले की, सेटवरचे जेवण खूप कंटाळवाणे आहे. हे ऐकताच दुसऱ्याच दिवशी रणबीरने माझ्यासाठी त्याच्या स्वयंपाकीकडून तोच नाश्ता बनवला जो मी काल खाल्ला होता. रणबीरच्या कुकने बनवलेला नाश्ता खूप चविष्ट होता.” तिच्यासाठी रणबीरच्या मनात असणारी काळजी पाहून रश्मिकाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.
तसेच ती पुढे म्हणाली की,”जेव्हा रणबीरने मला चविष्ट नाश्ता खाल्ल्यावर रडताना पाहिलं तेव्हा तो म्हणाला की, “रश्मिका, रोज हे बेचव पदार्थ तू का खातेस?” यावर मी रणबीरला सांगितले की, तू भाग्यवान आहेस कारण तुझ्याकडे चांगला स्वयंपाकी आहे, पण मी तुझ्याइतकी भाग्यवान नाही. मी एक सामान्य माणूस आहे.”
असा हा रणबीरचा प्रेमळ, गोड आणि काळजी घेणारा स्वभाव रश्मिकाला खूप आवडला.