साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा. नयनतारा ही ९ जून २०२२ रोजी दिग्दर्शक विग्नेश शिवन याच्या सोबत लग्नबंधनात अडकली. चेन्नईमध्ये दोघांचा विवाह एकदम ग्रँड पद्धतीने पार पडला.
काही दिवसांपूर्वी नयनतारा गरोदर असल्याची चर्चा सुरु होती. त्याला आणखी एक जोड म्हणजे नयनतारा आणि विग्नेश हे अनेकदा लहान मुलांसोबत वेळ घालवताना दिसले. यादरम्यानचे फोटो शेअर करत त्याने लिहले की “मी भविष्यासाठी सराव करत आहे.” यावरुन ते फॅमिली प्लॅनिंग करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली.
लग्नाच्या गोड बातमीनंतर नयनतारा आणि विग्नेश यांनी अवघ्या चार महिन्यातच पुन्हा एकदा गोड बातमी दिली. नयनतारा आणि विग्नेश यांच्या घरी नुकताच पाळणा हलला आहे. या बातमीने प्रेक्षकांनाही सुखद धक्का बसला आहे. कारण अवघ्या चार महिन्यातंच नयनतारा ही आई झाली. सरोगसीच्या मदतीने त्यांनी बाळांना जन्म दिल्याचे समजत आहे.
View this post on Instagram
विग्नेश शिवनने ट्विट करुन ही गूडन्यूज आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली. त्याने केलेल्या ट्विट वरून त्यांच्या घरी जुळ्या मुलांचे आगमन झाल्याचे समजते. या फोटोमध्ये बाळांच्या पायांना किस करताना आणि नयनतारा बाळांच्या पायाकडे पाहून हसताना दिसत आहे.
ही गोड बातमी चाहत्यांना देताना विग्नेश शिवनने लिहिले की, “नयन आणि मी आज आई-वडील झालो आहोत. आम्हाला दोन जुळी मुलं झाली आहेत. आमची प्रार्थना आणि पूर्वजांचे आशीर्वाद आम्हाला आमच्या दोन्ही मुलांच्या रुपाने मिळाले आहेत. उईर आणि उलगम यांना तुमच्या आशीर्वादाची गरज आहे.”
या पोस्टवर चाहते भरभरुन लाईक्स आणि कॉमेंट्स करून त्या दोघांना तसेच त्यांच्या मुलांना शुभेच्छा देत आहेत.