बॉलिवूड सिनेसृष्टीतील मस्तानी म्हणून ओळखली जाणारी प्रसिध्द अभिनेत्री दीपिका पदुकोण. दीपिका कायमच तिच्या अनोख्या ड्रेसिंग स्टाईलमुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर देखील प्रचंड ॲक्टिव असतेच. पण यावेळी ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.
जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त तिने तिच्या खासगी आयुष्यातील एक घटना सर्वांसोबत शेअर केली आहे. मागील काही दिवसांपासून दीपिका एका मानसिक आजाराच्या विळख्यात सापडली होती. या आजाराबद्दल खुलासा करताना तिने तिच्या आजारावर कशी मात केली हेही सांगितले.
दीपिका अनेकदा लोकांमध्ये मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी धडपड करताना दिसते. दीपिकाने तामिळनाडूमधील तिरुवल्लूर या ठिकाणी असलेल्या ‘लिव्ह लव्ह लाइफ’ या मानसिक आरोग्य फाउंडेशनच्या कार्यक्रमाला भेट दिली. यावेळी एनडीटीव्ही या प्रसारमाध्यमाशी बोलताना दीपिकाने तिच्या मानसिक आजाराबद्दलही खुलासा केला.
View this post on Instagram
तेव्हा दीपिका म्हणाली की, २०१५ मध्ये मी एका गंभीर आजाराशी झुंज देत होती. हा आजार काय आहे, याची मला काहीही कल्पना नव्हती. त्यावेळी जर माझ्या आईने माझ्यातली मानसिक आजाराची लक्षणे ओळखली नसती तर आज मी कोणत्या स्थितीत असती याची मलाही कल्पना नाही. मला २०१५ मध्ये मानसिक आजार झाला होता. यावेळी मी नैराश्याशी झुंज देत होती.
माझे आई-वडील बंगळुरूमध्ये राहतात. ते मला अनेकदा भेटायला यायचे. मी त्यांच्यासमोर खंबीर असल्याचे दाखवत होती. माझ्या आयुष्यात सर्व काही ठिक आहे, असा भास निर्माण करण्याचा मी प्रयत्न करत होती. पण जेव्हा ते पुन्हा घरी जाण्यासाठी निघायचे तेव्हा मात्र मला फार एकटं असल्याची जाणीव व्हायची. एकदा मला माझ्या आईने अनेक प्रश्न विचारले. माझ्या आयुष्यात एकटेपणा आहे हे तिला क्षणार्धात जाणवले आणि त्यावेळी मला वाटलं की त्या दोघांना देवानेच माझ्याकडे पाठवलंय.
मी मानसिक आजाराशी झुंज देत असताना कुटुंबाची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. माझ्या वैयक्तिक आयुष्यात काळजी घेणाऱ्यांची भूमिकाही महत्त्वाची आहे. यात माझ्या आईचा फार मोठा वाटा आहे. माझी बहीणही याबद्दल फार उत्साही आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती या मोहिमेचा भाग आहे. मी जेव्हा अशाप्रकारच्या आजार असलेल्या माणसांची काळजी घेणाऱ्यांबद्दल ऐकते तेव्हा मला माझा संघर्ष आठवतो. जर त्यावेळी माझी आई किंवा माझी काळजी घेणाऱ्यांनी माझ्यातील ही लक्षणे ओळखली नसती आणि योग्य ते उपचार घेण्यासाठी मला मदत केली नसती तर आज तितकी सक्रीय नसती. त्यावेळी माझी स्थिती काय असती, याचा विचार न केलेलाच बरा.”
२०१५ मध्ये दीपिकाने पहिल्यांदाच तिच्या या आजाराबद्दल खुलासा केला आणि इतरांनाही मदतीचा एक हाथ म्हणून लिव्ह लव्ह लाइफ हे फाउंडेशन सुरु केले.