लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी कपूर ही नेहमीच तिच्या बोल्ड लुकमुळे चर्चेत असते. लवकरच जान्हवीचा ‘मिली’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, सध्या ती चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे.
अनेकदा जान्हवी तिच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी जान्हवीने करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी करणने तुझा क्रश कोण आहे? असे विचारले असता जान्हवीने दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा याचं नाव घेतल होतं.
जान्हवीने एका मुलाखती दरम्यान तिची एक इच्छा व्यक्त केली. “कलाविश्वातील कोणत्या तीन अभिनेत्यांना तुझ्या स्वयंवरमध्ये बघायला आवडेल?”, असा प्रश्न जान्हवीला विचारण्यात आला. यावर जान्हवीने हृतिक रोशन, टायगर श्रॉफ आणि रणबीर कपूर या अभिनेत्यांची नावे घेतली, परंतू रणबीरचे लग्न झाल आहे हे लक्षात येताच “रणबीरचं लग्न झालं आहे, सगळेच विवाहबंधनात अडकले आहेत.” असे ती म्हणाली.
View this post on Instagram
जान्हवीच्या स्वयंवरासाठी दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा याचे नाव सुचवण्यात आल्यावर जान्हवी म्हणाली “व्यावहारिकदृष्ट्या त्याचं लग्न झालं आहे.” काही दिवसांपूर्वीच जान्हवीला तिचा एक्स बॉयफ्रेण्ड शिखर पहारिया सोबत स्पॉट करण्यात आलं होतं.
सध्या विजय देवरकोंडा आणि दाक्षिणात्य अभिनेत्री डेट करत असल्याच्या चर्चा सर्वत्र सुरु आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखती दरम्यान विजय यावर भाष्य करताना दिसला, “लोक तुमच्यावर प्रेम करतात. त्यामुळे तुमच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ते उत्सुक असतात. तुमच्या जीवनात काय चाललंय हे जाणून घ्यायला त्यांना आवडतं. अशा चर्चांमुळे मला काहीही फरक पडत नाही”, असं तो म्हणाला होता.