‘सारेगमप लिटिल चॅम्प’ या रिॲलिटी शोमधून गायिका म्हणून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली आर्या आंबेकर. लहानपणासूनच तिने तिच्या मधुर आवाजाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. आर्या नेहमीच सोशल मीडियावर फोटोज्, व्हिडिओज शेअर करत असते. आत्ता देखील ती सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. त्याचे कारणही तसंच काहीसं आहे.
आर्याने दिवाळीच्या निमित्ताने साडीतील काही सुंदर फोटोज् तिच्या अकाउंट वरून शेअर केले आहे. आणि त्या फोटोज् ना नेटकर्यांकडून बरच ट्रोल करण्यात आले आहे. त्याचे कारण असे की, नेटकर्यांनाच्या मते आर्याने साडी नेसून कपाळावर टिकली लावली नाही म्हणुन तिला ट्रोल केले जात होते. तर यावर ट्रोलर्सला आर्याने जबरदस्त उत्तर दिले आहे.
View this post on Instagram
जांभळ्या रंगाची किनार आणि लालकेशरी रंगाची साडी नेसलेले फोटोज् तिने शेअर करत लिहिले की, “सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा…” तसेच स्वत: हून साडी नेसण्याचा पहिलाच प्रयत्न उत्तमरित्या यशस्वी झाल्याचा आनंद तिने व्यक्त केला आहे.
परंतू ट्रोलर्सने मात्र ‘साडी नेसली पण टिकली का नाही लावली?’ आणि ‘खूप खूप सुंदर पण कुंकू लावायची विसरली की काही वेगळा विचार मनात आला आहे…’ असं म्हणतं तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला गेला. पण या सर्व प्रकारावर आर्या सडेतोड उत्तर देताना म्हणाली की, “टिकली लावली आहे. कृपया झूम करून बघा. कोणताही वेस्टर्न ड्रेस किंवा वन पीस घातला तरीही त्यावर मी काळी छोटी टिकली लावते. कृपया नीट बघून मग कमेंट करा. त्याशिवाय कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहचू नका.”