मराठी सिनेसृष्टीतील नामांकित ज्येष्ठ अभिनेते म्हणून ओळखले जाणारे सचिन पिळगांवकर. सचिनजी यांनी त्यांच्या अभिनयाने अख्खी सिनेमासृष्टी गाजवली होती.
शून्यातून स्वराज्य स्थापन करणारे उच्चपातळी गाठतातचं याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे सचिन पिळगांवकर. सुरुवातीला बालकलाकार म्हणून सचिनजींनी अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली. तर त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये ते फक्त अभिनेते म्हणूनच नाही तर गायक, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते अशा अनेक प्रकारच्या उत्कृष्ट भूमिका साकारत ते समोर आले आहेत.
आत्तापर्यंत सचिनजींना त्यांच्या जबरदस्त कामांमुळे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तर सुरूवातीच्या टप्प्यातच बालकलाकार म्हणून राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. याचप्रकारे आजपर्यंत त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. तर आता त्यात आणखी एका मोठ्या पुरस्काराची भर पडणार आहे.
View this post on Instagram
नुकतीच सचिनजींना आणखी एक पुरस्कार मिळणार याची घोषणा झाली आहे. सचिन पिळगांवकर यांना यंदाचा ‘गंधार गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. बालदिनाचे औचित्य साधून यावर्षीचा ‘गंधार गौरव पुरस्कार’ सचिन पिळगांवकर यांना जाहीर करण्यात आला आहे.
तर पुरस्काराचा भव्य सोहळा १४ नोव्हेंबर २०२२ रोजी गडकरी रंगायतन येथे सकाळी ११ वा. आयोजित करण्यात आला आहे. यावर्षीचा हा पुरस्कार मुंबई भाजपा अध्यक्ष, आमदार ऍड. आशिष शेलार आणि ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते सचिनजींना देण्यात येणार आहे.