बॉलिवूड अभिनेते, अभिनेत्री यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात तसेच स्टार किड्सदेखील चर्चेत असतात. आलिया रणबीर हे गेले काही दिवस चर्चेत होते. आता त्यांना मुलगीदेखील झाली आहे. मात्र आलियाने मुलीचा फोटो शेअर केलेला नाही. याबाबतीत त्यांनी गोपनीयता पाळली आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये या दोघांना कन्यारत्न प्राप्त झालं. माध्यमांच्या माहितीनुसार रणबीर आलियाने आपल्या मुलीसाठी ‘नो कॅमेरा’ पॉलिसी जाहीर केली. म्हणजे तिला भेटायला येणाऱ्या व्यक्तीने, माध्यमांनी तिचे फोटो काढू नये असे या दोघांचे मत आहे. अजूनपर्यंत या दोघांच्या कन्यारत्नाचा एकही फोटो बाहेर आलेला नाही.
नुकतंच या जोडप्याने त्यांच्या नव्या घराच्या ठिकाणी हजेरी लावून पाहणी केली. लवकरच रणबीर आणि अलिया त्यांची मुलगी राहा कपूर आणि कुटुंबासह या घरात राहायला येणार आहेत. नुकतच आलिया आणि रणबीर ने मुंबईच्या मीडियाची भेट घेतली आणि सगळ्यांशी मनमोकळा संवाद साधला त्यांनी फोटोग्राफर्सना राहाचे फोटो न काढण्याची विनंती केली . कोणाचाही हिरमोड होऊ नये म्हणून रणबीर कपूरने आपल्या मोबाईलमधला फोटो सर्वांना दाखवला त्याच्या या कृतीमुळे तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनी त्याच कौतुक केल. तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने सांगितले जरी आता फोटो काढण्यास मनाई केली असली तरी वेळ आल्यावर ते स्वत: आम्हाला फोटो काढण्यासाठी बोलावतील अस आश्वासन दिल आहे. सध्या रणबीर आलिया त्यांच्या नवीन प्रोजेक्टची तयारी करत आहेत.