बॉलिवूडमधील पंगा गर्ल म्हणून ओळखली जाणारी कंगना राणावत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अनेक कलाकार त्यांच्या अभिनयामुळे, ड्रेसिंग स्टाइलमुळे तर काही त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतातच. तशीच कंगना देखील आतापर्यंत तिच्या अनेक वक्तव्यांमुळे चर्चेत राहिली आहे.
कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ या आगामी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. तिने या चित्रपटामध्ये इंदिरा गांधी यांची प्रमुख भूमिका साकारली आहे. नुकतंच तिने तिच्या चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे. ती म्हणजे तिचं ट्विटर तब्बल दीड वर्षांनी पुन्हा एकदा आगमन झालं आहे.
ट्विटर अकाऊंट चालू होताच तिने तिच्या इमर्जन्सी या चित्रपटाचा BTS व्हिडिओ शेअर करत शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती दिली, तसेच तिने हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हेही सांगितले आहे. त्यानुसार इमर्जन्सी हा चित्रपट २० ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
२०२१ मध्ये बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान कंगनाने ट्विटर अकाऊंटवरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे दीड वर्षापूर्वी तिचं अकाऊंट सस्पेंड करण्यात आले होते. पण अचानक तिचं अकाऊंट रिस्टोअर झाल्याची माहिती तिने तिच्या चाहत्यांना दिली आहे. त्यामुळे सर्व स्तरातून तिच्या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तसेच कंगना राणावत सध्या पहिल्या क्रमांकावर ट्रेडिंग आहे. त्यामुळे ती भलतीच खुशीत आहे.