काही महिन्यांत आणि आगामी चित्रपटांमुळे बॉयकॉट बॉलिवूड हा ट्रेंड संपुष्टात आला आहे. बॉक्स ऑफिसवर पठाणने धमाकेदार कमाई केली आहे. त्यानंतर आता लवकरच आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या आगामी चित्रपटासाठी चांगलाच चर्चेत आला आहे. ‘शहजादा’ हा त्याचा आगामी चित्रपट असून त्याच्या प्रदर्शनाची तारीख सतत लांबणीवर पडत आहे. असे असूनही कार्तिक मात्र थांबायचं नाव घेत नाही, तो जोरदार चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसत आहे.
शहजादाच्या प्रमोशनसाठी कार्तिक सध्या उदयपूरमध्ये असून वेगवेगळ्या ठिकाणी हजेरी लावताना दिसत आहे. तर यादरम्यानचे काही फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल झाले असून कार्तिक त्याच्या एक्स गर्लफ्रेंड म्हणजेच ‘सारा अली खान’ सोबत दिसला आहे.
यामध्ये ते एकमेकांसोबत गप्पा मारत वेळ घालवताना दिसत आहेत. त्यांचे हे फोटो व्हायरल होताच त्यांच्या चाहत्यांकडून अनेक प्रकारच्या कमेंट्सचा वर्षाव होत आहे. काही चाहते हे फोटो पासून प्रचंड खूश झाले आहेत. तर काही दिवसांत ‘व्हॅलेंटाईन डे’ येणार असून या दिवसाशी संबंध जोडले जात आहेत.
कार्तिक आणि साराने ‘लव्ह आज कल’ या चित्रपटात एकत्र झळकले होते. तेव्हापासूनच त्यांची जोडी चाहत्यांना चांगलीच आवडली. या दोघांची लव्हस्टोरी ही लव्ह आज कल या चित्रपटापासूनच सुरू झाली होती. पण काही काही वर्षांनंतर यांच्यात ब्रेक अप झाल्याचे करण जोहरने त्याच्या ‘कॉफी विथ करण सिझन ७’च्या मंचावर उघडपणे सांगितले.
पण आता पुन्हा एकदा त्यांच्या नात्याबद्दल चर्चा रंगली आहे.