मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय आणि कलरफुल अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. पूजाने तिच्या सोशल मीडियावरून तिच्या लग्नाची घोषणा केली होती. एका मिस्ट्री मॅनसोबत फोटो शेअर करून तिने ही गूड न्यूज दिली. हा मिस्ट्री मॅन नक्की कोण आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक होते. नंतर तिने दोघांचे फोटो शेअर करत त्या मिस्ट्री मॅनची ओळख करून दिली.
पूजा सावंत लवकरच सिद्धेश चव्हाण याच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे. सध्या दोघांच्या घरी लग्नाची लगबग सुरु आहे. १६ फेब्रुवारी रोजी पूजा आणि प्रथमेशचा साखरपुडा पार पडला. तर नुकताच दोघांचा संगीत सोहळा पार पडला. त्यांच्या संगीत सोहळ्याला दोघांच्या घरचे आणि जवळचे नातेवाईक तसेच या संगीत सोहळ्यात सिनेसृष्टीतील कलाकारांनी देखील हजेरी लावली होती.
यावेळी सगळ्यांनी पूजासाठी स्पेशल डान्स देखील केले. तिच्या बहिणींनी ‘रुपेरी वाळूत’या गाण्यावर एक खास परफॉर्मन्स केला. तर तिच्या भावांनी लाडक्या बहिणीसाठी ‘गोड गोजिरी, ताई तू होणार नवरी’ या गाण्यावर खास डान्स केला. तसेच तिच्या आई – वडिलांनी, तिच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींनी पूजा आणि सिद्धेशच्या संगीतमध्ये भरघोस आनंद लुटून धुमाकूळ घातला. पूजा आणि सिद्धेशने देखील रॉमेंटिक डान्स केला, पण सगळ्यात जास्त आकर्षणाचा भाग ठरला तो म्हणजे पूजा आणि सिद्धेश यांचा बॉलिवूडमधील ‘सारी के फॉल सा’ या गाण्यावरचा स्पेशल डान्स. या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चाहते देखील यावर खुश होऊन लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
View this post on Instagram
संगीत सोहळ्यासाठी पूजाने खूप सुंदर वर्क असलेला लेहंगा घातला होता. तिच्या या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधले होते. तर सिद्धेशने काळ्या रंगाचा सूट घातला होता. यात दोघेही खूप सुंदर दिसत होते. तसेच या सोहळ्यामध्ये पुष्कर जोग, प्रार्थना बेहरे आणि तिचा नवरा अभिषेक जावकर, वैभव तत्ववादी, मेधा मांजरे, गौरी इंगवले, भूषण प्रधान, आदिनाथ कोठारे, भार्गवी चिरमुले, अमृता खानविलकर, अभिजित खांडेकर, सुखदा खांडेकर, चैत्राली गुप्ते या लोकप्रिय कलाकारांनी हजेरी लावली होती.
मागील काही दिवसांपूर्वीच पूजाच्या घरी व्याही भोजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पूजा आणि सिद्धेश या दोघांनी देखील पारंपरिक लूक केला होता. संगीतनंतर आता कोणता कार्यक्रम होतोय, याची सारेच आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच त्यांनी लग्नाची तारीख घोषित केली नसली तरी आता लग्नाचा मुहूर्त जवळ आला आहे हे नक्की. त्यामुळे आता लवकरच दोघांच्या घरी सनई-चौघडे वाजणार आहेत.