झी मराठी वाहिनीवरील मिसेस मुख्यमंत्री या मालिकेतून घराघरात पोहचलेली सुमी म्हणजेच बिनधास्त अभिनेत्री अमृता धोंगडे. तिने याच मालिकेतून सिनेसृष्टीत पदार्पण केले.
सर्वाधिक लोकप्रिय रिऍलिटी शोपैकीं एक शो म्हणजे ‘बिग बॉस मराठी.’ नुकताच या शोचा चौथा सिझन पार पडला. यंदाच्या एकापेक्षा एक सरस स्पर्धकांमुळे हा सिझन दणदणीत गाजला. तर या चौथ्या सिझनमध्ये कोल्हापूरची मिरची अमृता धोंगडे देखील सहभागी झाली होती. या शोमुळे तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.
सिनेसृष्टीत सगळीकडेच सध्या लगीन सराई सुरु असतानाच आता अमृताच्याही लग्नाची चर्चा सुरू झाली आहे की अमृता लवकरच लग्न करणार आहे. ही गोष्ट तिने स्वतःच कमेंट करत सांगितली आहे.
View this post on Instagram
अमृता सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव असते. ती अनेकदा तिच्या चाहत्यांसोबत संवाद साधताना देखील दिसते. तर याच सोशल मीडियावर अमृताला एका लहानग्या चाहत्याने व्हिडिओ शेअर करत लग्नाची मागणी घातली आहे. ‘प्रयण टेल्स’ या इंस्टाग्राम अकाउंटवरून व्हिडिओ शेअर करत ही मागणी घातली आहे. त्याने तिला थेट लग्न करणार का? हा प्रश्न विचारला.
या प्रश्नाचे उत्तर देत अमृताने कमेंट करत तिचा होकार कळवत तिने लिहीले की, “किती गोड, मुलगा पसंद आहे बरं का… तयारी ला लागा.” तर तिच्या या कमेंटवर छोट्या चाहत्यांनी रिप्लाय केला की, ” हो हो जुळल तर मग, पुढील बोलणीसाठी आम्ही तयार आहोत आणि तुमच्या या उत्तरासाठी व प्रेमासाठी खूप खूप आभार. प्रयण हा तुमचा खूप मोठा चाहता आहे. तुमच्या पुढील वाटचालीसाठी देव तुम्हाला कायम यश देवो.”
प्रयणचा हा गोड व्हिडिओ अमृताला चांगलाच भावला आहे. सोशल मीडियावर या लहानग्या चाहत्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे अन् अमृताची कमेंट सुद्धा.