सध्या सगळीकडे व्हॅलेंटाईन वीकचा माहोल बघायला मिळत आहे. रेखा – अमिताभ, सलमान – ऐश्वर्या, शाहीद – करीना ही बॉलिवूडमधील काही गाजलेली अफेअर्स आहेत, पण यासारखच आणखी एक गाजलेलं अफेअर म्हणजे विनोद खन्ना आणि अमृता सिंग.
आज अमृता तिचा ६४ वा वाढदिवस साजरा करत आहे. अमृता तिच्या कारकिर्दीत एक गाजलेली अभिनेत्री होती. अमृताने १९८३ मध्ये बेताब सिनेमातून आपल्या बॉलिवूड करिअरला सुरूवात केली. त्यानंतर तिने अनेक मोठ्या स्टारसोबत काम केलं आणि बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी जागा निर्माण केली. सिनेमातील तिचा बिनधास्त अंदाज लोकांना खूप आवडत होता.
सैफ अली खान सोबत लग्न करण्याआधी अमृताच नाव अनेकांशी जोडलं गेले होतं. त्याकाळात तिचं नाव दिग्गज क्रिकेटपटू रवी शास्त्री सोबत देखील जोडले होते. अमृता आणि रवी शास्त्री त्यावेळी एका सिरिअस रिलेशनशिप मध्ये होते. १९८९ मध्ये अमृताने विनोद खन्ना सोबत एक सिनेमा साईन केला होता, त्यावेळी अमृता आणि रवी रिलेशन मध्ये होते. मित्रांनी सहज म्हणून रवीला डीवचल,” अरे तिने विनोद सोबत सिनेमा साईन केला आहे, तेव्हा जरा लक्ष ठेव”. अस सांगितल्या रवी शास्त्री ही बेचैन झाले. एकेदिवशी रवी शास्त्रींनी मस्करीत अमृताला डीवचल, तू काहीही कर पण तू काही विनोद खन्नाला इम्प्रेस नाही करू शकत” आणि अमृताने हे चॅलेंज स्वीकारलं आणि ती विनोद खन्नाच्या मागे हात धुवून लागली.
अमृताने ते चॅलेंज पूर्ण केले. अमृता तर विनोद खन्नाच्या प्रेमात पार वेडी झाली होती. तोपर्यंत अमृता व रवी शास्त्रींच्या भांडणाच्या बातम्याही येऊ लागल्या होत्या. अमृताला सोडून रवी शास्त्रींनी करिअरवर फोकस करण्याचा निर्णय घेतला आणि अमृता व विनोद खन्नाच्या लव्हस्टोरीचा मार्ग मोकळा झाला. शूटींगच्या दुसऱ्या टप्प्यात हे प्रेम आणखीच बहरलं आणि सगळीकडे या दोघांची चर्चा सुरू झाली.
परंतू अमृता तिच्या पेक्षा ११ वर्षांनी मोठ्या असलेल्या मुलाच्या प्रेमात पडली आहे हे समजताच तिच्या आईने तिला विनोद खन्ना पासून लांब रहाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे अमृता विनोद खन्ना पासून वेगळी झाली. काही वर्षानंतर अमृताने तिच्यापेक्षा १२ वर्षांनी लहान सैफ अली खान सोबत लग्न करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. मात्र काही वर्षांच्या लग्नानंतर दोघांनी घटस्फोट घेतला.