बॉलिवूडच्या अनेक सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला त्यापैकी एक म्हणजे एसएस राजामौली यांचा ‘आरआरआर’ हा सिनेमा. या सिनेमाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. हा सिनेमा २४ मार्च २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला.
या सिनेमामध्ये ज्युनिअर एनटीआर, राम चरण, आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. या सिनेमातील ‘नाटू नाटू‘ या गाण्याला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. ऑस्कर हा मनोरंजन क्षेत्रातील सर्वाधिक लोकप्रिय आणि मानाचा समजला जाणारा पुरस्कार. तर यंदाच्या ऑस्करमध्ये “बेस्ट ओरिजिनल साँग” कॅटेगिरीमध्ये नाटू नाटू या गाण्याला नामांकन मिळाले आहे.
त्यामुळे फिल्ममेकर आणि चाहते प्रचंड खूश आहेत. तसेच हे गाणं भारताला ऑस्कर मिळवून देईल अशी अपेक्षा सर्वजण व्यक्त करीत आहेत. तसेच यंदाच्या ऑस्करमध्ये आणखी एक मोठी भर पडली आहे त्यामुळे प्रेक्षक आणि नाटू नाटूचे चाहते या भव्य पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
ऑस्करच्या मंचावर नाटू नाटू हे गाणं लाइव्ह सादर करण्यात येणार असल्याची घोषणा द अकॅडमीच्या ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आली आहे. त्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “राहुल सिप्लिगंज आणि काला भैरव यांचे नाटू नाटू गाणे ९६व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये लाइव्ह पाहता येईल. ABC वर तुम्ही ऑस्कर पुरस्कार सोहळा रविवारी (१२ मार्च) पाहू शकता.”
Rahul Sipligunj and Kaala Bhairava. “Naatu Naatu." LIVE at the 95th Oscars.
Tune into ABC to watch the Oscars LIVE on Sunday, March 12th at 8e/5p! #Oscars95 pic.twitter.com/8FC7gJQbJs
— The Academy (@TheAcademy) February 28, 2023
परंतू या सोहळ्यामध्ये राहुल सिप्लिगंज आणि काला भैरव यांच्यासोबतच नाटू नाटू गाण्यावर ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण देखील परफॉर्म करणार की नाही असा प्रश्न साध्य सर्वच प्रेक्षकांना पडला आहे.
तर १२ मार्च रोजी लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी अनेक दिग्गज कलाकार मंडळी उपस्थित राहणार आहेत.
12 International Awards Won By RRR Movies Is A Proof That Indian Cinema Is Shining Globally