बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री राणी मुखर्जी हिने अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मन जिंकले आहे. रानीचा आतापर्यंतचा अभिनय आणि तिच्या कामावर चाहते फारच खूश आहेत.
राणी मुखर्जी लवकरच रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. तिचा ‘मिसेज चॅटर्जी वर्सेस नॉर्वे’ हा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर पाहून सर्व स्तरातून राणी मुखर्जी यांचे कौतुक होत आहे. त्यांच्या कौतुकाचे कारण म्हणजे या सिनेमात त्यांनी साकारलेली आईची भूमिका.
मिसेज चॅटर्जी वर्सेस नॉर्वे हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित आहे. या सिनेमात राणी मुखर्जी सागरिका भट्टाचार्य यांची भूमिका साकारत आहे. ही तीच महिला आहे जिने आपल्या मुलांना परत मिळवण्यासाठी संपूर्ण देशाशी एकटी लढली होती. तर या शूर आई – वडिलांची कथा आणि त्यांनी अनुभवलेली वेगवेगळी संकटे या सिनेमात रेखाटली आहे.
अनुरूप भट्टाचार्य आणि सागरिका भट्टाचार्य या जोडप्याच्या आयुष्यात आलेल्या संकटावर या सिनेमाची कथा आहे. २०११ मध्ये त्यांनी ४ महिन्यांचं बाळ आणि २ वर्षांचा मुलगा गमावला होता. तर या मुलांना परत मिळवण्यासाठीची धडपड या सिनेमात दाखवली आहे.
या सिनेमाचा ट्रेलर पाहून सागरिका यांनी प्रतिक्रिया देत सांगितले की, “माझी गोष्ट पाहताना मला कसे वाटते ते शब्दात मांडणे कठीण आहे. ट्रेलर बघून मला असं वाटलं की मी माझी लढाई पुन्हा जिवंत करत आहे. मला विश्वास आहे की लोकांसाठी ही कथा जाणून घेणे आणि आजही स्थलांतरित माता/पालकांना कसे वागवले जाते हे पाहणे महत्त्वाचे आहे, जर्मनीमधील या दुःखद कथेने या वाक्याचा पुरावा दिला आहे.एका आईकडून दुस-या आईला माझा पाठिंबा. मी राणी मुखर्जीचे आभार मानू इच्छितो की मी ज्या वेदना आणि संघर्षातून गेली ते पाहून पुन्हा एकदा मला भरून आले आहे.”
मिसेज चॅटर्जी वर्सेस नॉर्वे हा सिनेमा १७ मार्च २०२३ रोजी होणार असून या सिनेमाचे दिग्दर्शन अशिमा छिब्बर यांनी केले आहे.