आपल्या उत्कृष्ट अभिनयाने व अनोख्या स्टइलने सर्वांची मने जिंकणारा अभिनेता म्हणजे अल्लू अर्जुन त्याने टॉलीवूड मधेच नाही तर बॉलिवूड मध्ये देखील स्वतःचे नाव कमावले आहे. त्याचे चाहते त्याच्या अभिनयासाठी जीवाचं रान करतात. आज त्याच्या वाढदिवसानिम्मित आपण अल्लू अर्जुन व स्नेहा रेड्डी यांची लव्हस्टोरी जाणून घेऊ. अल्लू अर्जुन व स्नेहा रेड्डी यांचा प्रेमविवाह झाला आहे. त्यांची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी भन्नाट आहे.
त्या दोघांची भेट एका लग्नामध्ये झाली होती. स्नेहा नुकतीच तिची अमेरिकेतली मास्टरची डिग्री पूर्ण करून भारतात आली होती. अल्लू अर्जुन हे नाव तिच्यासाठी मुळीच नवीन नव्हतं कारण तेव्हा अल्लूचं नाव तेलगू चित्रपटांत गाजतं होतं. स्नेहाला पहिल्यांदा पाहताच अभिनेता तिच्या प्रेमात पडला होता. अल्लुने जेव्हा पहिल्यांदा स्नेहा कडे पाहिले तेव्हा तिने त्याच्या कडे पाहून स्मित हास्य केले त्याचं क्षणी अल्लू अर्जुन तिच्या प्रेमात पडला. मित्राच्या लग्नातच त्यांनी एकमेकांचे फोन नंबर एक्सचेंज केले त्यांच फोनवर बोलणे सुरुझे झाले. ती हैदराबाद मधील एका प्रसिद्ध व्यावसायिकाची मुलगी आहे. तर अल्लू अर्जुन देखील त्यावेळी प्रसिद्धीच्या शिखरावर होता. त्यामुळे स्नेहा त्याला एक सुपरस्टार म्हणुनच ओळखत होती.
View this post on Instagram
जेव्हा त्यांनी त्यांच्या लग्नाबद्दल आपआपल्या घरी सांगितले तेव्हा मात्र त्यांच्या घरून लग्नासाठी नकार आल्याने अल्लू अर्जुनने त्याच्या वडिलांना खूप समजावले व स्नेहाच्या घरी त्यांच्या लग्नासाठी मागणी घालण्यास तयार केले. परंतु स्नेहाच्या वडिलांनी त्यांच्या लग्नासाठी नकार दिल्याने त्या दोघांनी खूप विनवण्या केल्याने त्यांच्या घरचे लग्नासाठी तयार झाले. व ६ मार्च २०११ रोजी त्यांचा विवाह सोहळा पर पडला.