दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या पुष्पा या चित्रपटाने केवळ भारतातीलच नाही तर संपूर्ण जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली आणि पुष्पाची केमिस्ट्री, या चित्रपटामधील गाणी, अॅक्शन सिन्स या सर्वांनीच प्रेक्षकांची मनं जिंकली. आता पुष्पा २ ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट आहेत. ‘मैं झुकेगा नहीं साला’, ‘फ्लावर नहीं फायर है’ या पुष्पा चित्रपटामधील डायलॉग्सने तर प्रेक्षकांना वेड लावलं.
उद्या म्हणजे ८ एप्रिलला अल्लू अर्जुनचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिम्मित पुष्पा च्या टीम त्यांना एक खास गिफ्ट दिले आहे. ते म्हणजे आता पुष्पा २ चित्रपटाचा एक व्हिडीओ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अल्लू अर्जुन हा खास लूकमध्ये दिसत आहे. टी-सीरिजच्या युट्यूब चॅनलवर पुष्पा-2 या चित्रपटाचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला एक वृत्तनिवेदक पुष्पाबद्दल माहिती देताना दिसत आहे. तो म्हणतो, ‘तिरुपती तुरुंगातून पुष्पा फरार झाला आहे.’ तर दुसरी न्युज अँकर म्हणते, ‘पुष्पाला पकडण्यासाठी पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या’ आता तुरुंगातून फरार झालेला पुष्पा हा कुठे गेला आहे? असा प्रश्न सर्वांना पडतो. पण याचं उत्तर या व्हिडीओच्या शेवटी कळते. पुष्पा हा तुरुंगातून फरार होऊन जंगलामध्ये जातो. एका कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये पुष्पाची झलक दिसते.
Where is Pushpa? | Pushpa 2 – The Rule 🔥 | Hindi | Allu Arjun | Sukumar | Rashmika | Fahadh Faasil
टी-सीरिजच्या युट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आलेल्या पुष्पा-2 चित्रपटाच्या या व्हिडीओमध्ये अल्लू अर्जुन ‘अब रुल पुष्पा का’ हा डायलॉग म्हणताना दिसत आहे. पुष्पा-2 मध्ये काही बॉलिवूडमधील कलाकार देखील काम करणार आहेत, असं म्हटलं जात आहे. या चित्रपटात सलमान खान आणि अजय देवगण हे महत्वाची भूमिका साकारतील, असंही म्हटलं जात आहे.
पुष्पा द राइज हा चित्रपट 2021 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता अल्लू अर्जुनचे चाहते पुष्पा २ म्हणजेच पुष्पा द रुल या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.