बॉलीवूडचा बादशाह म्हणजेच शाहरुख खान नेहमीच चर्चेत असतो. मागील काही महिन्यान पासून तो पठाण या चित्रपटामुळे चर्चेत होता, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता पुन्हा एकदा किंग खान चर्चेत आला आहे. पण यावेळी तो त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत आला नाही, तर यावेळी त्याने एक नवीन रेकॉर्ड केला आहे.
View this post on Instagram
शाहरुख खान गेली ३ दशके चित्रपटसृष्टीवर राज्य करत आहे. त्याने आता पर्यंत अनेक हिट चित्रपट सिनेसृष्टीला दिले आहेत. शाहरुखचे केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जग भारत लाखो चाहते आहेत. आता शाहरुख खाननं पुन्हा त्याची लोकप्रियता सिद्ध केली आहे. त्याला आणखी एक मोठं यश मिळालं आहे. खरं तर, टाईम मासिकने 2023 सालासाठी जगभरातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. टाईम मासिकच्या या यादित शाहरुख खानचं नावं हे अग्रस्थानी आहे.
या यादीसाठी जवळपास १२ लाख वाचकांनी मतदान केले, त्यापैकी चार टक्के मते ५७ वर्षीय किंग खानला मिळाली. त्याने फुटबॉलपटू लियोनल मेस्सी, ब्रिटनचे राजपुत्र हॅरी आणि मेगन मर्केल, ऑस्कर विजेती मिशेल यो आणि मेटाचा सीईओ मार्क झुकरबर्ग यांना मागे टाकले आहे. वर्षांतील सर्वात प्रभावी व्यक्ती ठरवण्यासाठी दरवर्षी ‘टाइम’ मासिक आपल्या वाचकांकडून प्रतिसाद घेते. दुसरा क्रमांक इस्लामी शासनपद्धतीत अधिक स्वातंत्र्य मिळावे यासाठी लढा देणाऱ्या इराणी महिलांना मिळाला आहे.
ब्रिटनचे राजपुत्र हॅरी यांना तिसऱ्या तर त्यांची पत्नी मेगन मर्केल यांना चौथ्या क्रमांकाची पसंती मिळाली आहे. हॅरी यांना १.९ टक्के मते मिळाली. जानेवारीमध्ये प्रकाशित झालेला त्यांचा ‘स्पेअर’ हा स्मरणग्रंथ चर्चेत राहिला होता, त्यांनी त्यामध्ये राजघराण्यातील अनेक पैलू उघड केले आहेत. फुटबॉलपटू मेस्सी १.८ टक्के मतांसह पाचव्या स्थानावर आहे. अभिनेत्री मिशेल यो, टेनिसपटू सेरेना विल्यम्स, झुकरबर्ग आणि ब्राझीलचे अध्यक्ष लुइझ इनॅशियो लुला दा सिल्वा यांचाही जगभरातील सर्वात प्रभावी शंभर व्यक्तींमध्ये समावेश आहे.