‘खतरोंके खिलाडी’ या शोमध्ये ‘बिग बॉस 16’चे दोन स्पर्धकांच्या झळकले आहेत. हे स्पर्धक म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसून शिव ठाकरे व अर्चना गौतम हे आहेत. ‘बिग बॉस’ मध्ये गेल्या पासून अर्चनाने खूप कमी वेळात अकेनांची मन जिंकून घेतली. तिचा चाहता वर्ग देखील प्रचंड मोठा आहे. ती ‘बिग बॉस 16’ची तिसरी रनर अप ठरली होती.
तसेच शिव ठाकरे देखील ‘बिग बॉस’च्या शोमधून अत्यंत लोकप्रिय झाला आहे. शिवने देखील अतिशय उत्तम प्रकारे ‘बिग बॉस’ मध्ये त्यांची कामगिरी पार पाडून तो या शो चा उपविजेता ठरला होता. त्याचा चाहता वर्ग देखील प्रचंड मोठा आहे.
रोहित शेट्टीचा ‘खतरों के खिलाडी या शो चा १३ वा सिझन सुरु होणार असून त्याचे शूटिंग सध्या साउथ आफ्रिकेत सुरु आहे. या शोची प्रेक्षक प्रचंड आतुरतेने वाट बघत आहेत. हा शो लवकरात लवकर टी.व्ही वर दाखवणार असून त्याबद्दल सतत काही न काही अपडेट समोर येत आहेत.
शो सुरु होण्यापूर्वी त्या शोबद्दल एक वाईट बातमी समोर आली आहे. सेट वरून सतत एलिमेशनच्या बातम्या देखील समोर येत आहेत. या सिझनमध्ये ‘बिग बॉस फेम अर्चना व शिव हे दोघे दिसून येणार असून अर्चना मात्र या शोच्या चौथ्या आठवड्यात एलिमनेट झाली आहे. याबाब स्पष्ट खुलासा झाला नसला तरी सुद्धा तिचे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.