येत्या १६ डिसेंबर २०२३ ला जीओ सिनेमा या ओटीटी चेनलवर ‘ऑरेंज लिली’ ही हिंदी फिल्म प्रदर्शित होणार आहे. सस्पेन्स ड्रामा असलेल्या या फिल्मचं लेखन आणि दिग्दर्शन समीर वंजारी यांनी केलं आहे. अभिनेत्री मीरा जोशी यामध्ये आपल्याला प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. एका सायको मुलीचं पात्र मीराने साकारलं आहे. तिच्या आजवरच्या भूमिकांपेक्षा हे पात्र अगदी हटके असल्याचे ती सांगते.
फार्महाउसमध्ये एकत्र वेळ घालवण्यासाठी आलेल्या जोडप्पामध्ये भांडण होतं, आणि नंतर मुलगी अचानक नाहीशी होते. ती रागाऊन तिथून निघून गेली का? का तिच्यासोबत काही घातपात झालाय? याच्या भवती ही कथा फिरत राहते. अगदी शेवटपर्यंत त्या मुलीविषयी म्हणजे ‘लिली’बद्दल गूढ कायम राहतं. या सिनेमात वेगवेगळे ट्विस्ट् या सिनेमात पाहायला मिळणार आहे.
View this post on Instagram
देवेंद्र गायकवाड यांनी साकारलेली पोलिसाची भूमिका ही सिनेमात चार चांद लावते. अभिनित पंगे या कलाकाराचा प्रमुख भूमिका असलेला हा पहिलाच सिनेमा तरी मुरलेल्या अभिनेत्यासारखा त्याचा सिनेमा मध्ये वावर दिसतो. घर, बंदूक, बिर्याणी मधली मारिया म्हणजे श्वेतांबरी घुटे हिची सिनेमात सरप्राईजिंग भूमिका आहे. त्याचसोबत नितीन धंदुके, कुशल शिंदे, किरण राव, व्यंकटेश पवार, हेमंत फरांदे या कलाकारांनी आपली पात्र कमालीची साकारली आहेत.
हे देखील वाचा : चाळीपासून सिनेसृष्टीपर्यंतचा विनोदवीर भरत जाधव यांचा अविश्वसनीय प्रवास
सिनेमाचे निर्माते किरण राव आणि व्यंकटेश पवार यांना नाटकाची पार्श्वभूमी आहे. नाटक आणि सिरीयलमध्ये अभिनय करत असताना त्यांनी स्वता सिनेमा निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या पहिल्याच सिनेमाला जिओ सिनेमा सारखा प्लाटफॉर्म मिळाला आहे. “विष्णू किरण फिल्मस” आणि “द लाईट इयर फिल्मस” या प्रोडक्शन हाउस अंतर्गत या सिनेमाची निर्मिती झाली आहे.