अभिनय करणं हे काही सोप्प काम नाही, पण त्या पेक्षाही सगळ्यात जास्त अवघड काम म्हणजे एखाद्याला हसवणे. हसवण्याची कला ही प्रत्येकात असते असं नाही, फार कमी लोकांना ते जमत. गेले अनेक वर्ष आपल्याला हसवणारा टेलिव्हिजनवरील सगळ्या लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra).
गेले अनेक वर्ष या शोमधील कलाकार आपल्याला हसवत आहेत. या शोने प्रेक्षकांना आपलसं केलं आहे. या मधील प्रत्येक कलाकार, प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांना खळखळून हसवयला भाग पाडतं. या शोमधील कलाकारांना संपूर्ण महराष्ट्राकडून भरभरून प्रेम मिळालं आहे.
या शोमधील असाच एक कलाकार आपल्याला नेहमीच पोट धरून हसायला भाग पाडतो. मग तो अभिनय असुदे, बोलण्याची वेगळी स्टाईल असुदे किंवा वेगळे डायलॉग असुदे प्रत्येक गोष्ट आपल्याला हसायला भाग पाडते. आणि तो कलाकार म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका पवई फिल्टर पाड्याचा बच्चन म्हणजेच गौरव मोरे. गौरव आतापर्यंत आपल्याला हसवण्यात कुठेच कमी पडला नाही. त्याच्या उत्तम टाइमिंगने आणि विनोदी शैलीने प्रेक्षकांना भरपूर हसवलं आहे. पण आता गौरवच्या आणि हास्यजत्रेच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. आणि ती बातमी म्हणजे फिल्टर पाड्याच्या बच्चनने म्हणजेच गौरवने या शोचा निरोप घेतला आहे. गौरवने स्वतः याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.
गौरवने हास्यजत्रेच्या रिकाम्या सेटचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिले आहे, की “Hello everyone i am a gaurav more from powai filter pada, Ta na na na na naaaaaa. आरा बाप मारतो का काय मी….ये बच्ची… रसिक प्रेक्षक आपण हया साध्या मुलाला खूप प्रेम दिलं. नाव दिलं सन्मान दिलात त्याबद्दल मी आणि माझा परिवार आपले कायम ऋणी आहोत. मला सांगताना खूप वाईट वाटतय की मी गौरव मोरे आपल्या लाडक्या मालिकेतून म्हणजेच “महाराष्ट्राची हास्य जत्रा” मधून आपला निरोप घेत आहे.
गौरव पुढे म्हणाला, “माझ्या कामातून कोणच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्या सगळ्यांची मनापासुन माफी मागतो. महाराष्ट्राची हास्य जत्रा सोडून अगदीच काही दिवस झाले आणि नवा शो घेऊन तुमच्या भेटीला आलो माध्यम सारखं राहिलं आणि तुमचं प्रेम देखील ! असं म्हणतात ना नव्या प्रवासाची गोष्ट और असते आणि म्हणूनच नव्या प्रवासात नव्या शो साठी तुमचा खंबीर पाठिंबा कायम असावा. नवा प्रवास सुरू झाला आणि यातून देखील तुमच्या सारख्या रसिक प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करणार आहे म्हणून तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्छा प्रेम असच राहू दे”
गौरवच्या या पोस्टमुळे चाहत्यांना मात्र धक्का बसला आहे. पण गौरव आता पुन्हा एकदा आपल्याला हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. सोनी टीव्ही वाहिनीवर काही दिवसापूर्वी ‘मॅडनेस मचायेंगे’ हा कार्यक्रम सुरु झाला आहे. यामध्ये मराठी मधील हेमांगी कवी, कुशल बद्रिके आणि यांच्यासोबतच अनेक कलाकार दिसत आहेत. आता काही दिवसांपूर्वीच गौरवने देखील या कार्यक्रमात एंट्री घेतली आहे. त्यामुळे गौरवला आता आपल्याला तिकडे पाहता येणार आहे.