भारतातील ग्लोबल स्टारपैकी एक म्हणजे प्रियांका चोप्रा. प्रियांकाने फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूड मध्येही चांगलंच नाव कमावलं आहे. तसेच तिच्या अनेक सीरीजमधून तिने अनेकदा प्रेक्षकांना चकित केले आहे. तर अशा या देसी गर्ल प्रियांकाने जगभरातील चाहत्यांची मने जिंकली आहेत.
प्रियांका ही भारतीय सिनेसृष्टीतील अशी एकमेव अभिनेत्री आहे जी आतापर्यंत ४० हून अधिक मासिकांवर झळकली आहे. तिने आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे आणि त्यामुळे कायमच भारताचं नाव लौकिक झाले आहे. तर ही देसी गर्ल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
View this post on Instagram
आता प्रियांका ‘देसी गर्ल’ थेट ब्रिटीश वोग या लोकप्रिय मासिकावर झळकणार आहे. महत्त्वाचं म्हणजे ती भारतातील पहिली अभिनेत्री आहे जी वोगच्या मासिकेच्या कव्हर पेजवर दिसणार आहे.
ब्रिटीश वोग ( British Vogue ) या इंस्टाग्राम अकाउंट वरून नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये प्रियांका खूपच छान लूकमध्ये दिसत आहे. तसेच ती तिच्या मुलीसोबत पोज देताना दिसत आहे. पण त्यात मात्र तिची मुलगी मालती मेरीचा चेहरा दिसत नाही. तरी देखील सर्वत्र तिच्या या पोस्टची जोरदार चर्चा सुरु आहे.