रवी जाधव (Ravi Jadhav) यांनी भरभरून केलं कोकणातील गावच्या घराचं वर्णन: प्रत्येकाला आपल्या गावची खूप ओढ असते, गावी जाण्यसाठी सगळेच नेहमी उत्सुक असतात. त्यात घराच्या एकदम जवळ नदी, डोंगर असतील तर खूपच मज्जा येते. सुट्टी लागली की कधी एकदा गावी जातोय असं प्रत्येकाला वाटतं. त्यात आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात गावाला जाऊन निवांत वेळ घालवणे यात काही वेगळीच मज्जा असते. गावी गेलं की गावची माणसं, गावची माती अशा सगळ्याच गोष्टी आपल्याशा वाटतात, मग तिथून पुन्हा परत येणे जरा जडच होऊन जातं.
आपण गावी गेलो की तिकडचे फोटो व्हिडीओ सगळचं आपण सोशल मीडियावर शेअर करत असतो. कलाकार मंडळीना देखील नेहमची त्यांच्या गावची ओढ असते. ते सुद्धा नेहमीच फोटो, व्हिडीओ शेअर करताना दिसून येतात. अशातच मराठी सिनेसृष्टीतील एका लोकप्रिय कलाकाराने त्यांच्या गावचा व्हिडीओ शेअर केला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनी त्यांच्या गावाकडील घराचा व्हिडीओ शेअर केला. माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणातील संगमेश्वर तालुक्यातील ‘कासे’ या त्यांच्या गावी ते गेले होते, त्यावेळी त्यांनी एक सुंदर व्हिडीओ शूट केला. या व्हिडीओमध्ये रवी जाधव यांनी त्यांचं संपूर्ण कौलारू घर, तुळस, सुंदर अशी गणपतीची मूर्ती, घराच्या जवळून वाहणारी नदी, आंब्याच्या आणि सुपारीच्या बागा, लाल मातीचा कच्चा रस्ता, उंच उंच डोंगर, कोकणात साजरा होणारा माघी गणेशोत्सव हे सगळ दाखवलं आहे. या सोबतच या व्हिडीओमध्ये रवी जाधव यांनी सगळ्यांसोबत भजनावर ठेका धरलेला देखील दिसून येत आहे.
View this post on Instagram
हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी कॅप्शन लिहिले की, “गावी गेलं का मन बेभान होतं आणि सोबत गहीवरतही. माघी गणेशोत्सवाला संगमेश्वर तालूक्यातील कासे या माझ्या गावी गेलं की पुन्हा मुंबईला येऊच नये असं वाटत!” पुढे त्यांनी लिहिले की, “तुमच्या मूळ ठिकाणी गाडी चालवताना तुम्हाला तुमच्या मुळाशी जोडणारे गाणे ऐकणे हा एक नॉस्टॅल्जिक आणि हृदयस्पर्शी अनुभव निर्माण करणे आवश्यक आहे. हे सर्व जिथून सुरू झाले तिथपर्यंतच्या तुमच्या प्रवासाच्या साउंडट्रॅकसारखे आहे.”
रवी जाधव (Ravi Jadhav) यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्यांनी आतापर्यंत टाईमपास, बालक पालक यांसारखे अनेक सुपरहिट आणि समाजाची वेगळी बाजू दाखवून देणारे सिनेमे मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. मराठी सोबतच त्यांनी हिंदीमध्ये देखील त्यांचा दबदबा निर्माण केला आहे. मागील काही महिन्यांपूर्वी त्यांनी दिग्दर्शित केलेली ‘ताली’ ही सिरीज देखील चांगलीच गाजली होती. तर आता लवकर रवी जाधव ‘अटल बिहारी वाजपेयी’ यांच्या आयुष्यावर आधारित ‘मै अटल हू’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत.