मागील काही दिवसांपूर्वीच चित्रपटसृष्टीतील सगळ्यात लोकप्रिय आणि बॉलिवूडमधील सर्वात मानाचा पुरस्कार सोहळा म्हणजे ‘६९ वा ह्युंदाई फिल्मफेअर २०२४’ पार पडला. या पुरस्कार सोहळ्याकडे संपूर्ण भारतासह बॉलिवूडच्या कलाकारांचे देखील लक्ष लागलेले असते. पुरस्कार सोहळ्यात कोण बाजी मारणार? कोणाला सर्वाधिक पुरस्कार मिळणार? हे पाहणे उत्सुकतेचे असते. भारतासह विदेशातून देखील या पुरस्कार सोहळ्याला लोकप्रियता मिळते.
यंदाचा फिल्मफेअर मुंबईत नाही तर गुजरात येथे पार पडला. पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार, दिग्दर्शक, संगीतकार मंडळींनी हजेरी लावली होती. १९५४ साली फिल्मफेअरला सुरुवात झाली, तर यंदा या पुरस्कार सोहळ्याचे ६९ वे वर्ष. यावर्षी या पुरस्कार सोहळ्यात ‘अॅनिमल’ आणि ‘12th फेल’ या चित्रपटांनी बाजी मारली. या दोन चित्रपटांना सर्वाधिक पुरस्कार मिळाले. तर अभिनेत्री ‘आलिया भट्ट’( Aliya Bhatt) हिला ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ या चित्रपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ हा पुरस्कार मिळाला. तर अभिनेता ‘रणबीर कपूर’(Ranbir Kapoor) याला ‘अॅनिमल’या चित्रपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ हा पुरस्कार मिळाला.
रणबीरच्या ‘अॅनिमल’या चित्रपटाला सर्वाधिक पुरस्कार मिळाले. रणबीरच्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरले होते. चाहत्यांना हा चित्रपट, यातील गाणी तसेच रणबीरची अॅक्टिंग प्रचंड आवडली. पण काहींनी मात्र यावर सडकून टीका देखील केल्या. यामध्ये अगदी बॉलिवूडमधील काही प्रसिद्ध व्यक्तींनी देखील टीका केली.
यंदाच्या फिल्मफेअर सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची धुरा निर्माता-दिग्दर्शक ‘करण जोहर’(Karan Johar) याच्याकडे होती. २००१ पासून करण या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळत आहे. सध्या फिल्मफेअर सोहळ्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता रणबीर कपूर करण जोहरवर ओरडताना दिसून आला आहे. यामध्ये अभिनेता आयुष्मान खुराना आणि निर्माता करण जोहर सूत्रसंचालन करताना दिसून येताय. यावेळी ते दोघे रणबीरची मदत मागताना दिसतात करण म्हणतो, “रणबीरच करू शकतो, रणबीरच करणार आणि रणबीरला केलं पाहिजे, रणबीरने आमची मदत केली पाहिजे.” यावर संतापून रणबीर म्हणतो, “सुनाई दे रहा है, बहरा नही हूँ मै” यावर आयुष्मान आणि करण घाबरतात.
View this post on Instagram
तर रणबीर आता लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात आलिया भट्ट आणि विकी कौशलसोबत दिसणार आहे. तसेच रामायण या चित्रपटात तो प्रभू श्री रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर अॅनिमलच्या सिक्वेल मध्ये देखील दिसणार आहे. आणि त्याचा ‘ब्रम्हास्त्र २’ हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.