करणच्या प्रश्नावर ‘सारा अली खान’चे अनोखे उत्तर:
सध्या गाजत असलेला हाय स्कोरिंग शो म्हणजे कॉफी विथ करण. करण जोहरने एखादा विचारलेला प्रश्न आणि त्यावर एखाद्या सेलिब्रिटीने दिलेले उत्तर यावरून सगळ काही ट्रोल होतं हे मागच्या अनेक सिझनवरून आपण सांगू शकतो. यंदाच्या सिझनच्या पहिल्याच एपिसोडमध्ये करणच्या एका प्रश्नांवर दीपिकाने जे उत्तर दिले त्यावरून सोशल मिडीयावर जे काही तांडव झाले हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. या जोडीनंतर दुसऱ्या भागात अभिनेता सनी देओल आणि बॉबी देओल या भावांनी हजेरी लावली. पण आता पुन्हा एकदा पहिल्या एपिसोडसारखा धमाकेदार तिसरा एपिसोड होणार असं चाहत्यांना वाटत आहे. कारण या तिसऱ्या भागात सारा अली खान आणि तिची मैत्रीण अनन्या पांडे येणार आहेत. आगामी तिसऱ्या भागाचा प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे.
या शोमधील क्वीज राऊंड प्रेक्षकांच्या आवडीचा आहे. करणने विचारलेल्या प्रश्नांवर कलाकार काय उत्तर देतात हे पाहायला सर्वानांच आवडतं. असाच एक प्रश्न करणने साराला विचारला असता साराने एका क्षणात या प्रश्नाचे उत्तर दिले.
करणने साराला असा प्रश्न विचरला की, अनन्या कडे असे काय आहे? जे तुझ्या कडे नाही?.
करणचा हा प्रश्न एकताच तिने लगेच ‘द नाइट मॅनेजर’ असं उत्तर दिलं. ‘द नाइट मॅनेजर’ ही आदित्य रॉयची वेब सिरीज आहे. या सिरिजमध्ये आदित्यने महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
साराने केलेला खुलासा ऐकून अनन्याने देखील सगळे मला यावरून काही ना काही बोलत असतात असं सांगितलं. तसेच गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड मधील हॉट अँड हँडसम हंक आदित्य रॉय आणि अनन्या पांडे यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू आहेत. कलाकारांच्या पर्सनल आयुष्यावर अनेक प्रश्न विचारणाऱ्या या शोमध्ये अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्याबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.