आजकाल सोशल मिडिया हा प्रत्येकाच्या आयुष्यातील जणूकाही महत्वाचा भाग ठरला आहे. सोशल मिडियावर आपली लोकप्रियता कायम ठेवण्यात मनोरंज क्षेत्रातील मंडळी नेहमीच अग्रेसर असते. अनेक कलाकार तर चाहत्यांशी सोशल मिडियाच्या माध्यमातून संवाद साधताना दिसतात, त्यांच्या आयुष्यातील काही खासगी शेअर करताना दिसतात. कलाकारांचे लाखो चाहते असतात, मग ते बॉलीवूड पासून ते हॉलीवूड पर्यंत सगळ्यांचेच.
भारतात जसे दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, आलीया भट्ट, जान्हवी कपूर आणि विराट कोहली यांचे सर्वाधिक फॉलोवर्स आहेत.
तर आता हॉलीवूडच्या एका गायिकेने एक वेगळाच विक्रम केला आहे. आता पर्यंत हॉलीवूडची सेलिब्रेटी काईली जेनर हिचे सर्वात जास्त फॉलोवर्स होते. तर आता काईलीला मागे टाकत सेलेना गोमेझ हिने इंस्टाग्राम वर सर्वाधिक फॉलोवर्सचा विक्रम केला आहे. सेलेना गोमेझ ही केवळ हॉलिवूडच नाही तर संपूर्ण जगातील पहिला महिला ठरली आहे, जिचे इंस्टाग्राम वर सर्वाधिक फॉलोवर्स आहेत. सेलेनाचे इंस्टाग्राम ४० करोड इतके फॉलोवर्स आहेत.
सेलेनानं इंस्टावर तिला फॉलो करणाऱ्या काही चाहत्यांसोबतचे फोटोही शेयर केले आहे. चाहत्यांचा तिला मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. तिनं फोटो शेयर करताना लिहिलं आहे की, “मी तुम्हा सर्व 400 करोड लोकांना मिठी मारू शकेन अशी इच्छा आहे.”
सेलेनाचे 400 करोड फॉलोवर्स झाल्याबद्दल जगभरातून तिच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.