सिनेसृष्टीतील क्यूट गर्ल अभिनेत्री सोनम कपूर आज काल बॉलिवूडमध्ये फारच कमी वेळा काम करताना दिसून येते. त्याचे कारण म्हणजे सध्या सोनमने तिच्या घराकडे आणि संसाराकडे संपूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे.
सोनम आणि आनंद आहुजा या दोघांनी ८ मे २०१८ रोजी लग्नगाठ बांधली. आज त्यांच्या वैवाहिक जीवनाला ५ वर्षे पूर्ण झाली आहेत. सोनम आणि आनंद हे दोघे गेल्याच वर्षी आई-वडील झाले. त्या दोघांना मुलगा झाला असून त्याचे नाव वायु ठेवले आहे. त्यामुळे सोनम सध्या तरी तिचं आईपण जगतेय. असे असले तरी सोनम आणि आनंद दोघेही सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात. त्यामुळे ते आणि त्यांचे चाहते कायमच एकमेकांसोबत जोडलेले असतात.
सिनेमामुळे सोनमची चर्चा नसली तरी तिच्या खासगी आयुष्यामुळे आणि तिच्या वेगवेगळ्या कामगिरीमुळे ती कायम चर्चेत असते. आज देखील सर्वत्र सोनमचीच चर्चा आहे. त्याचे कारण म्हणजे सोनम आणि आनंद यांच्या लग्नाचा आज पाचवा वाढदिवस. याचं निमित्त साधून सोनमने सोशल मीडियावर काही खास फोटोज् शेअर केले. यामध्ये सोनम व आनंद यांचे रोमँटिक अंदाजातील फोटो देखील पाहायला मिळाले.
पण यातील एका फोटोने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. तो फोटो म्हणजे त्यांचा मुलगा वायुचा. यापूर्वीही सोनमने आणि आनंदने वायु सोबतचे काही फोटोज् शेअर केले आहेत. परंतू प्रत्येकवेळी वायुचा चेहरा मात्र झाकलेला असायचा. परंतू आज त्यांच्या लग्नाच्या पाचव्या वाढदिवशी त्यांच्या ८ महिन्यांच्या वायुची पहिली झलक पाहायला मिळाली आहे. या फोटोमध्ये वायु आनंदसोबत खेळताना दिसत आहे.
View this post on Instagram
सोनमने हे सुंदर फोटोज् पोस्ट करत लिहिले की, “आमच्या लग्नाचा आज वाढदिवस! दररोज मी माझ्या नजरेतील ताऱ्याचे आभार मानते की, तुम्ही मला माझा जीवनसाथी आणि सोलमेट म्हणून लाभले. माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम ७ वर्षांसाठी धन्यवाद. जे आनंद, उत्कटता, दिलखुलास गप्पा, संगीत, प्रवास, लाँग ड्राईव्ह आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या सुंदर वायुने भरलेले. लव्ह यू माय जान.. मी कायम तुझी गर्लफ्रेंड, बेस्ट फ्रेंड आणि पत्नी असेन, तुझ्यासोबतचा माझा प्रत्येक दिवस खरोखरच अभूतपूर्व आहे!”
सोनमच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी आणि तिच्या चाहत्यांनी कमेंट्स करत त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत वायुला भरभरून आशीर्वाद देत आहेत.
हे देखील वाचा : साता समुद्रापार रुपेरी पडद्यावर झळकणार ‘महाराष्ट्र शाहीर’