बॉलिवूडचा किंग खान सध्या त्याच्या ‘जवान’ या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. पठाण मधून तब्बल वर्षानंतर शाहरुख खान मोठ्या पडद्यावर दिसला होता. हे पाहून त्याचे चाहते प्रचंड खुश झाले. आणि आता जवानमुळे त्याला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहायला चाहते उत्सुक आहेत. ‘पठाण’ने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. आता जवान किती कमाई करणार हे पाहणे देखील उत्सुकतेचे आहे.
येत्या २ जून ला जवान चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता, परंतु आता हा चित्रपट ७ सप्टेंबर ला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चाहते थोडे नाराज झाले आहेत.
शाहरुख ट्विटर वर नेहमीच सक्रीय असतो, #AskSRK सेशन दरम्यान ट्विटरवर त्याच्या चाहत्यांशी तो सवांद साधत असतो आणि चाहत्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो. ‘जवान’ची रिलीज डेट बदलल्यानंतर शाहरुख खानने पुन्हा एकदा चाहत्यांसोबत #AskSRK सेशन केलं. ‘जवान’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलल्यामुळे एक चाहता म्हणाला की, “सर बरं झालं जवान सप्टेंबर मध्ये केला, माझी परीक्षा १ जूनपासून सुरू होणार होती.” यावर शाहरुखने प्रतिक्रिया दिली, “म्हणूनच पुढे ढकलली.” शाहरुखचे हे उत्तर पाहून सगळ्यांनाच हसू आले. तो नेहमीच गमतीशीर उत्तर आपल्या चाहत्यांना देत असतो.
एकाने विचारले, “तुम्ही पोस्टरमध्ये का नाही?” यावर शाहरुख म्हणाला, “निर्मात्याने मला परवानगी दिली नाही. म्हटलं तुझं नाव पुरे. हाहा.” तर एकाने विचारले, “मलाही यावेळी सीटबेल्ट लावण्याची गरज आहे का?” किंग खानने उत्तर दिले, “नाही , यावेळी फक्त हेल्मेट.”