मराठी चित्रपट सृष्टीत ‘तमाशा live’ हा संगीतमय चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाच्या नावातच वेगळेपण असल्यामुळे चित्रपटात काय घडामोडी घडणार हे जाणून घेण्यासाठी रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे.
‘तमाशा live’ मध्ये सोनाली कुलकर्णी, हेमांगी कवी, आयुषी भावे,मृणाल देशपांडे, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, पुष्कर जोग, नागेश भोसले, मनमीत पेम या दिग्गज अभिनेता आणि अभिनेत्रीं ची अनोखी भूमिका असणारा हा चित्रपट येत्या १५ जुलै रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
सचित पाटील आणि सोनाली कुलकर्णी वृत्तनिवेदकाच्या भूमिका साकारत आहे हे ट्रेलर मधून दिसून येत आहे. साधारणत: पत्रकारिता जगातील स्ट्रगल, जबाबदारी तसेच जनतेचा दृष्टिकोन यांवर अधोरेखित चित्रपट असल्याचे समजत आहे. या चित्रपटाची कथा संगीता सोबत पुढे ढकलत आहे, त्यामुळे या कथेचा शेवट काय होणार हे जाऊन घेण्यासाठी प्रेक्षक वर्ग उत्सुक आहे.
एटीएट पिक्चर्स प्रस्तुत, अक्षय बर्दापूरकर निर्मित, अमितराज व पंकज पडघन यांचे संगीत, उमेश जाधव यांचे नृत्य दिग्दर्शन आणि संजय जाधव यांचे दिग्दर्शन लाभले आहे.