‘बाळूमामा च्या नवान चांगभलं’ या मालिके मधून घराघरात पोहचलेला अभिनेता सुमित पुसावळे हा या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत असून त्यांनी त्यांच्या सुमित पुसावळे च्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. पण तसं जरी असलं तरी आता सुमितच्या बाबतीत एक धक्कादायक गोष्ट घडली आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून तो त्याच्या कामामुळे खूप चर्चेत आहेत.
सुमीतने नुकतीच ‘ई टाईम्स’ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याच्याबरोबर घडलेला प्रकार सांगितला. सोशल मीडियावरील त्याच्या फॉलोवर्सच्या संख्येमुळे त्याला एका प्रोजेक्टमधून बाहेर काढण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा त्याने केला.
View this post on Instagram
सुमीत म्हणाला, “मी गेली अनेक वर्ष बाळूमामांची भूमिका साकारतो आहे. या भूमिकेमुळे मला प्रेक्षक ओळखतात. अनेकदा ते मला याच नावाने हाक मारतात. पण आता माझ्याबरोबर जे घडलं त्यामुळे मी खूप दुःखी झालो आहे. मी नुकतीच एका चित्रपटासाठी आणि म्युझिक व्हिडीओसाठी ऑडिशन दिली होती. या ऑडिशननंतर माझी निवडही करण्यात आली होती. पण त्यानंतर त्यांनी माझं सोशल मीडिया अकाउंट आणि त्यावरील माझे फॉलोवर्स पाहिले आणि त्यांनी थेट मला या प्रोजेक्टसाठी नकार दिला.”
पुढे तो म्हणाला, “या गोष्टीचा मला खूप धक्का बसला, मला खूप दुःख झालं. कारण त्यांनी या कारणाने मला नकार दिला. दुर्दैवाने आता कलाकाराचं भविष्य सोशल मीडिया ठरवायला लागलंय. तुम्ही किती चांगलं काम करता यापेक्षा तुमच्याकडे किती फॉलोवर्स आहेत हे जास्त महत्वाचं आहे. हे खूपच वाईट आहे. आता मी जास्तीत जास्त व्हिडीओ आणि रील सोशल मीडियावर पोस्ट करण्याचा प्रयत्न करत आहे, कारण आता हे गरजेचं आहे असं मला वाटू लागलंय. हे सोशल मीडिया प्रेशर नाहीये तर हे आता करावंच लागणार आहे.” सुमीतचं हे बोलणं आता खूप चर्चेत आलं आहे.