सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे ती म्हणजे IPL ची. आयपीएल चा १६ वा हंगाम अगदी जोरात सुरु आहे. यांची भुरळ सेलिब्रिटी ते राजकारण्यांना देखील पडली आहे. अनेक सेलेब्रिटी स्टेडियम वर देखील दिसून येतात. सध्या अॅपलचे सीईओ टीम कूक देखील भारतात आहे. मुंबई येथे अॅपलचे नवीन स्टोर सुरु झाले आहे, यासाठी अॅपलचे सीईओ टीम कूक हे भारतात आले आहेत.
गुरुवारी (२० एप्रिल) कोलकाता नाइट रायडर्स व दिल्ली कॅपिटल्स या संघांत खेळवला गेला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळवला गेला. हा सामना पाहण्यासाठी अॅपलचे सीईओ टीम कूक यांनीही हजेरी लावली होती, तसेच यांच्या सोबत बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर व पती आनंद अहुजा हे देखील उपस्थित होते. सोनमने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन टीम कूक यांच्याबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये कूकनाही आयपीएलची भुरळ पडल्याचं दिसत आहे. कोलकाता नाइट रायडर्स व दिल्ली कॅपिटल्समध्ये झालेल्या सामन्याचा त्यांनी आनंद घेतल्याचं फोटोत दिसत आहे.
View this post on Instagram
हा फोटो पोस्ट करत सोनमने लिहिले आहे की, “टीम कूक आणि संपूर्ण ॲपल टीने इथे राहण्याचा तुम्ही आनंद घेतला असेल, अशी आशा आहे. भारतातील ॲपलच्या स्टोरसाठी तुम्ही सकारात्मकता ठेवली आहे. हा वर्ल्ड क्लास अनुभव आम्हालाही घेता यावा यासाठी तुम्ही घेतलेल्या प्रयत्नांसाठी आभार.”
काही दिवसांपूर्वी टीम कूक हे माधुरी दिक्षित सोबत मुंबईचा वडा पाव खाताना दिसून आले होते. आणि काल त्यांनी सोनम कपूर सोबत आयपीएल चा देखील आनंद घेतला. हे पाहून टीम कुक देखील भारतात राहण्याचा आनंद घेत आहेत हे दिसून येतय.