मागील काही महिन्यांपासून सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान‘ या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे.
४ वर्षांनंतर सलमान full fledged सिनेमात झळकला आहे. त्यामुळे सलमानचे चाहते त्याच्या या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते.
काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. तो ट्रेलर पाहून अनेकांनी आपले मत मांडले होते. एकूणच ट्रेलरवर प्रेक्षक सकारात्मक आणि नकारात्मक अशा मिश्र प्रकारच्या कमेंट्स करताना दिसले. तर आज २१ एप्रिल रोजी किसी का भाई किसी की जान हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.
सलमानच्या चाहत्यांनी सिनेमा पाहण्यासाठी थिएटर्सवर धूम ठोकली आहे. अगदी थिएटरमध्ये बसल्यापासूनच प्रेक्षक इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक यांसारख्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सिनेमाबद्दल आणि भाईजान, पूजा आणि शहनाजबद्दल आपलं मत मांडताना दिसत आहेत.
काहींना सलमानची एंट्री आवडली तर काहींनी पूजा आणि शहनाजच्या कामची स्तुती केली. महत्वाचं म्हणजे अनेक प्रेक्षकांनी सांगितले की त्यांना मध्यांताराच्या आधीचा भाग प्रचंड आवडला, परंतू मध्यांतरानंतरचा भाग प्रेक्षकांच्या तितकासा पसंतीस उतरला नाही.
किसी का भाई किसी की जान सिनेमा पाहून प्रेक्षकांनी सांगितले की, “या मूवीमध्ये सलमान खान खूपच कमी वेळ दाखवण्यात आला आहे, आधीचे सिनेमे पाहता हा सलमानचा बेस्ट मूवी तर नाही पण हा avrage मूवी होता.”
हे देखील वाचा : टीम कूक यांना देखील पडली IPL ची भुरळ…
प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
“पठाणनंतर सलमानचा हा सिनेमा वर्षातला सगळ्यात हिट मूवी.”
“या सिनेमात बॉलिवूड आणि साऊथचा सुंदर मेळ घातला आहे.”
“भाईजानचा सिनेमा म्हणजे एकदम कडकच.”
“सिनेमात फॅमिली ड्रामा आणि नातं खूप मस्त दाखवलं आहे.”
“सिनेमात सलमान आहे मग सिनेमा ब्लॉकब्टर होणारच.”
“या सिनेमात आम्हाला पूर्वीचा आमचा भाईजान पुन्हा बघायला मिळाला.”
“सलमानसोबत पूजाला पाहताना खूप मजा आली.”
“इंटरवल आधीचा भाग खूप मनोरंजक होता पण नंतर मात्र मला झोप यायला लागली.”
तसेच केआरके ने लिहिले की, “सिनेमात सलमान खान ८० वर्षांचा म्हातारा वाटतं आहे आणि साठीच्या वयात आर्ध्या वयाच्या मुलीसोबत रोमान्स काय मस्करी आहे.”
अशाप्रकारे प्रेक्षकांनी बिनधास्तपणे सिनेमाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.