नाटक, मालिका ते चित्रपट काहीही असो तिच्या कामाने प्रेक्षकांचं मन जिंकून घेणारी अभिनेत्री हृता दुर्गुळे. हृताची फुलपाखरु आणि महाराष्ट्राची क्रश म्हणून देखील ओळख आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर अगदी कमी कालावधीत सिनेसृष्टीत तिचं अढळ स्थान निर्माण केलं आहे.
हृता तिच्या दुर्वा, फुलपाखरू, मन उडू उडू झालं या मालिकेतून घराघरात पोहोचली. तसेच टाईमपास ३ मध्ये देखील ती तिच्या वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांसमोर आली. तर तिचं सर्वाधिक कौतुक झालं ते नुकताच प्रदर्शित झालेल्या अनन्या या चित्रपटासाठी.
View this post on Instagram
कोणत्याही कामातील तिची जिद्द, मेहनत आणि कामाची मिळालेली परवणी किंवा कोणता पुरस्कार यामुळे कायमच तिचं कौतुक पाहत आलो आहोत. तर आता पुन्हा एकदा सर्वत्र हृताचं कौतुक सुरु आहे. त्याचे कारण म्हणजे तिच्या अनेक मोठमोठ्या कामगिरी आणि पुरस्कारांमध्ये आणखी एक मोलाची भर पडली आहे.
मराठी सिनेसृष्टीत अनेक मोलाचे आणि मानाचे पुरस्कार सोहळे दरवर्षी पार पडतात. त्यांपैकी एक म्हणजे झी टॉकीज वाहिनीवरील ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ हा सोहळा. नुकतच रविवार दि. २६ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांना हा सोहळा पाहायला मिळाला.
महाराष्ट्राचा फेवरेट कोण? या सोहळ्यातील प्रमुख आकर्षण म्हणजे महाराष्ट्राचा ‘पॉप्युलर फेस ऑफ दि इयर.’ या पुरस्कारासाठी अनेकजण शर्यतीत होते. परंतू यंदाच्या या पुरस्कारासाठी हृताने बाजी मारली आहे. हृताने महाराष्ट्राचा ‘पॉप्युलर फेस ऑफ दि इयर’ या मानाच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे.
त्यामुळे सर्व स्तरातून हृताचं कौतुक होत असून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.