आपल्या अभिनयासोबत खासगी आयुष्याबाबतही कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजेच सुश्मिता सेन.
अभिनेत्री सुश्मिता सेन गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. त्याला कारणही तसेच होते. ते म्हणजे तिचे आणि व्यावसायिक व आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांचे नाते. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो शेअर करत दोघांनीही आपल्या नात्याची कबुली दिली आणि नेटिझन्सनी आपल्या भुवया उंचावल्या. आता ते सर्सास एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करताना दिसत असतात.
View this post on Instagram
सुश्मिता सेन सध्या सार्डिनिया येथे सुट्टीचा आनंद घेत आहे. याचे ती वेळोवेळी सोशल मीडियावर फोटोही टाकत असते. तर नुकताच सुश्मिताने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडियो शेअर केला. त्यावर ललित मोदी यांनी केलेल्या कमेंटमुळे तो व्हिडियो कुठला याचा खुलासा झाला. प्रशस्त यॉटमधून निळ्याशार समुद्रात उडी मारण्याचा हा तिचा व्हिडियो आहे.
सुश्मिताचा हा व्हिडियो बघून अनेक जणांनी त्यावर व्यक्त होत कौतुक केले आहे. बऱ्याच जणांनी तिला कमेंट्समध्ये “तू खूप सुंदर आहेस” असेही सांगितले आहे. तिचा हा व्हिडियो बघून ललित मोदींना सुद्धा कमेंट करण्यावाचून राहवले नाही. “सार्डिनियामध्ये तू खूप हॉट दिसत आहेस.” असे कमेंटमध्ये ललित मोदी यांनी म्हटले. त्यांनी केलेल्या कमेंटमुळे पुन्हा एकदा त्या दोघांचे नाते चर्चेत आले आहे.
“कुटुंबासोबत मालदीव, सर्दीनिया दौऱ्यावरुन नुकताच लंडनला परतलो. यावेळी माझी ‘बेटर हाफ’ सुश्मिता सेनही सोबत होती. अखेर नवी सुरुवात आणि नवं आयुष्य सुरू झालं आहे. माझ्या आनंदाला पारावार उरलेला नाही,” असे ललित मोदी यांनी ट्विट करत सुष्मिताबरोबरचे फोटो शेअर केले होते. ललित मोदी यांच्या या कमेंटमुळे ते दोघेही एकमेकांच्या किती प्रेमात आहेत हे दिसून येत आहे.