अस म्हणतात की, जोड्या या स्वर्गात बांधल्या जातात, आपण फक्त निमित्त मात्र असतो. रुपेरी पडद्यावर अनेक कलाकारांच्या जोड्या हिट आहेत. मग त्यात प्रेमात पडून लग्नगाठ बांधलेले असो किंवा काही कारणाने ब्रेकअप झालेल्याही अनेक जोड्या आहेत.
कलाकारांच्या जोड्या जुळवायला नेटकरी प्रचंड उत्सुक असतात. रणबीर आणि कतरिना हे बॉलिवूड मधील एक्स कपल आहेत. काही काळानंतर दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले. रणबीरने आलिया सोबत लग्नगाठ बांधली अन् लवकरच त्यांच्या घरी पाळणा देखील हलणार आहे. तर दुसरीकडे कतरिनाने देखील विकी कौशल सोबत लग्नबंधनात अडकली आहे. पण नेटकरी मात्र त्यांची जोडी विसरायला तयारच नाही.
बऱ्याच काळानंतर कतरिना आणि रणबीर एकत्र दिसून आल्याने सोशल मीडियावरील चर्चांना उधाण आले आहे. नवरात्री निमित्त ते दोघेही एका कार्यक्रमात एकत्र दिसले. ज्वेलर्सच्या ब्रँडिंगसाठी हे दोघेही एका कार्यक्रमात उपस्थित होते.
त्याचवेळी टॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता नागार्जुन, आर माधवन, प्रभु गणेशन हे सेलिब्रेटी देखील उपस्थित होते. एकाच कार्यक्रमाचे निमित्त असल्याने रणबीर आणि कतरिना यांना एकमेकांच्या समोर आल्यावाचून पर्याय नाही हे तितकच खरं होतं. शेवटी असेच झाले. रणबीरने कतरिनाकडे पाहिले अन् तो कॅमेऱ्यात टिपला गेला. त्यामुळे सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु झाली आणि यावर नेटकऱ्यांच्या वेगवेळ्या प्रकारच्या कॉमेंट्स पहायला मिळत आहेत.
तसेच त्यावेळी टॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता नागार्जुन, आर माधवन, प्रभु गणेशन हे सेलिब्रेटी देखील उपस्थित होते. येवढे मोठमोठे सेलिब्रेटी उपस्थित असूनही चर्चा रंगली ती फक्त कतरिना आणि रणबीरची.