काही दिवसांपूर्वीच हिंदी बिग बॉसच्या १६व्या सीजनचा ग्रँड प्रीमिअर अगदी धमाक्यात पार पडला. बिग बॉसच्या घरात एकापेक्षा एक अश्या तगड्या कलाकारांनी प्रवेश केला आहे. मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या सीजन चा विजेता शिव ठाकरे याने देखील अगदी मराठमोळ्या अंदाजात हिंदी बिग बॉसच्या घरात एन्ट्री करून प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले.
मराठी बिग बॉसचा विजेता म्हणून शिव कडे एक तगडा स्पर्धक म्हणून पाहिले जात आहे. पण गेल्या काही दिवसांपासून शिवला घरात एकाकीपणा जाणवत आहे, ‘आपल्याला एकट पाडलं जात आहे’ असं बोलताना तो दिसला.. शिवला पहिल्याच आठवड्यात नॉमीनेट करण्यात आलं, त्यामुळे तो थोडा नाराज दिसत आहे. बिग बॉसच्या घरात प्रवेश केलेल्या तझाकिस्तानच्या अब्दु रोझीक याला फारशी हिंदी येत नाही त्यामुळे त्याच्याशी बोलतांना इतर स्पर्धक इंग्रजी भाषेचा वापर करत आहेत. तझाकिस्तानच्या अब्दुची आणि मराठमोळ्या शिवची चांगलीच बॉण्डिंग झालेली दिसत आहे, दोघे नेहमी एकत्र दिसत असतात.
View this post on Instagram
बिग बॉसच्या घरात प्रवेश केलेला आणखी एक सदस्य म्हणजे साजिद खान. शिवला नॉमिनेट केल्यामुळे तो नाराज होता, परंतु त्याने आपल्या स्टॅन्डअप कॉमेडीने शिवला हसवण्याचा प्रयत्न केला. यामुळे साजिद आणि शिव यांच्यामध्ये देखील चांगलं बॉण्डिंग झालेलं दिसून येत आहे. साजिद आणि अब्दु बरोबरच आता प्रियांका आणि अंकित सोबतही शिवची मैत्री होताना दिसत आहे. आता यांची ही मैत्री अजून किती दिवस टिकून राहणार हे बघणे मनोरंजक असेल. शिवला सुरुवातीच्याच काही दिवसात एकट वाटणं हे शिवने बोलून जरी दाखवले असले तरी तो किती दिवस बिग बॉस च्या घरात दिसून येईल याची चांगलीच चर्चा रंगली आहे. परंतु त्याचे चाहते त्याला आपला मराठी माणूस या नात्याने चांगला सपोर्ट करत आहेत.