मालिका विश्वातील “तारक मेहता का उल्टा चष्मा” ही अनेक वर्षांपासून प्रचंड लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे.
ही मालिका गेल्या १४ वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेमुळे अनेक कलाकारांना बरीच प्रसिद्धी मिळाली. तसेच त्यांनी साकारलेली भूमिका ही कायम प्रेक्षकांच्या मनात जिवंत राहणार यात काही वाद नाही. असे असूनही काही वर्षांपासून होणारी कलाकारांची एक्सिट पाहून प्रेक्षकांचा मात्र हिरमोड होत आहे.
दयाबेन ही प्रमुख भूमिका साकारणाऱ्या दिशा वकाणी या मालिकेत पुन्हा कधी परतणार याची प्रेक्षक वाट पाहत असतांना, मालिकेतून आणखी काही कलाकारांची एक्सिट पहायला मिळत आहे. आजही प्रेक्षक दयाबेनची आतुरतेने वाट पाहत आहेत. परंतु अजूनही ती परतण्याची चिन्हे दिसत नाही. आणि त्यांच्या ऐवजी दुसऱ्या अभिनेत्रींना मालिकेमध्ये घेणार असल्याची बरीच चर्चा झाली पण यातील एकाही गोष्टीवर शिक्कामोर्तब झालेले नाही.
View this post on Instagram
तारक मेहता ही भूमिका साकारणारे शैलेश लोढा यांनी देखील काही दिवसांपूर्वीच मालिकेला रामराम ठोकला आहे. ह्या दिवाळी मध्ये दायाबेन परतणार या चर्चांना नुकतच आलेलं उधाण शैलेश यांच्या एका पोस्टने थोपवल.
त्यांच्या या पोस्टने सर्व प्रेक्षकांना गोंधळात टाकले आहे. शैलेश हे नेहमीच सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह असतात. सध्या त्यांच्या या पोस्टने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी नुकताच एक फोटो शेअर करत त्यावर कॅप्शन लिहले की,
ये भी सुन लीजिये….
“औरों के हक़ का जोड़ा सब उसने
किसी के मन से जुड़ कर नहीं देखा,
इस बात से ही फितरत पता चलती है उसकी
जिसने भी उसे छोड़ा, मुड़ कर नहीं देखा ”
त्यामुळे त्यांच्या या पोस्टचा संदर्भ थेट तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेशी आणि मालिकेचे निर्माते असित मोदी यांच्याशी जोडत आहे.