मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक सई ताम्हणकर (Sai Tamhankar) हिने काही दिवसांपूर्वी एक्सेल एंटरटेनमेंटसोबत दोन नव्या प्रोजेक्ट्सची घोषणा केली होती. २०२४ हे वर्ष सईसाठी बॉलिवूडमय ठरतंय यात शंका नाही. ‘भक्षक‘ या हिंदी वेब शोनंतर आता सई ‘अग्नी’साठी सज्ज होत आहे. २०२४ मध्ये सई बॉलिवूडमध्ये दमदार काम करताना दिसतेय आणि आगामी काळात ती अजून उत्कठावर्धक प्रोजेक्ट्स करणार यात शंका नाही. ‘आंतरराष्ट्रीय फायर फायटर’ दिवशी सई’ने ‘अग्नी’ चं पोस्टर शेअर केलं आहे. प्रतीक गांधी, जितेंद्र जोशी, दिवेंद्यू, सयामी खेर अशी तगडी स्टाकास्ट असलेला ‘अग्नी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
प्रतीक गांधी या बड्या कलाकारांसोबत सई या आगामी ‘अग्नी’मध्ये दिसणार असून तिच्यासाठी हा प्रोजेक्ट खास आहे असं ती सांगते.
एक्सेल एंटरटेनमेंटसोबत पुन्हा काम करण्याची संधी तिला मिळाली असून या प्रोजेक्टबद्दल सई म्हणते, “एक्सेल एंटरटेनमेंट सारख्या प्रोडक्शन हाऊससोबत काम करण्याची संधी मला मिळाली याचा खूप आनंद आहे. अग्नी हा प्रोजेक्ट नक्कीच माझ्यासाठी खूप खास आहे. एवढ्या बड्या स्टार्ससोबत काम करण्याचा अनुभव खूप कमालीचा होता. आज ‘आंतरराष्ट्रीय फायर फायटर दिवशी’ अग्नी चित्रपटाचं पोस्टर शेअर करताना आम्हाला खूप आनंद होतोय. हा चित्रपट खूप वेगळा असणार असून तो नक्कीच प्रेक्षकांना एक वेगळा संदेश देऊन जाणार आहे.”
View this post on Instagram
‘ग्राउंड झिरो’ आणि ‘अग्नी’ या व्यतिरिक्त सई ‘डब्बा कार्टेल’ मध्ये सुद्धा दिसणार आहे. या वर्षाच्या शेवटी नेटफ्लिक्सवर ‘डब्बा कार्टेल’ रिलीज होणार असून एक्सेल एंटरटेनमेंटसोबत सईचा हा तिसरा प्रोजेक्ट असणार आहे. या चित्रपटात शबाना आझमी, ज्योतिका शालिनी पांडे, निमिषा सजयन, अंजली आनंद, गजराज राव आणि जिशु सेनगुप्ता यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे.
एकंदरीत कामाचं सातत्य जपत सई बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणार यात शंका नाही. २०२४ मध्ये सईच्या बॉलिवूड प्रोजेक्ट्सची लाईन खूप मोठी आहे आणि हे बघण आता उत्सुकतेच ठरतंय.