बिग बॉस मराठी सीझन २ चा विजेता शिव ठाकरे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शिव सध्या बिग बॉस हिंदी सीझनच्या १६ व्या भागात स्पर्धक म्हणून आहे, त्याच्यामुळे हा सीझन चांगलाच गाजत आहे. त्याच्या उत्तम खेळीमुळे शिवचे सगळीकडेचं कौतुक होत आहे. बिग बॉस मराठी मुळे शिवची फॅन फॉलोइंग देखील प्रचंड वाढली आहे, आणि आता हिंदी बिग बॉस मुळे त्याच्या फॅनस मध्ये आणखी भर पडली आहे. सोशल मिडियावर त्याच्या चाहत्यांनी हिंदी बिग बॉस सीझन १६ चा विनर शिवच होणार असे घोषित देखील करून टाकले. त्यामुळे दिवसेंदिवस त्याच्या चाहत्यांमध्ये भर पडताना दिसत आहे.
View this post on Instagram
शिव बिग बॉसच्या घरात गेल्या पासून ट्रेंड मध्ये आहे, याआधी शिवने प्रियांका चाहर-चौधरी आणि सुंबूल तौकीर खान यांना मागे टाकत एक मिलिअन ट्वीटसचा रेकॉर्ड केला होता.
मिडिया रिपोर्टनुसार, आता शिवने ट्विटरवर आणखी एक रेकॉर्ड केला आहे. त्याच्या चाहत्यांनी REIGN OF SHIV THAKARE हे वाक्य ट्रेंड केले आहे. #ShivThakare असा हॅशॅटगही ट्रेंड होत आहे. शिव ठाकरे बिग बॉस १६ च्या या आठवड्यात कॅप्टन झाल्यानंतर REIGN OF SHIV THAKARE हे ट्रेंड सुरु झाले आहे. यादरम्यान शिवचे विविध फोटो-व्हिडिओ पोस्ट केले जात आहेत.
शिवचा गेम देखील सगळ्यांना आवडत आहे. एवढेच नव्हे बिग बॉसच्या माजी स्पर्धकांनीही शिवचे भरभरून कौतुक केले आहे. बिग बॉसमध्ये खेळलेला मनू पंजाबी आणि बिग बॉस सीझन ६ ची विजेती उर्वशी यांनी शिवला ‘स्मार्ट स्पर्धक’ म्हटले आहे. याशिवाय फैजल खान, शेखर सूमन, मेघा धाडे, किशोरी शहाणे या कलाकारांनीही शिवला पहिल्या दिवसापासून पाठिंबा दिला आहे. पंजाबी म्हणतो की, प्रियांकासारखे स्पर्धक शिवसोबत मुद्दाम भांडण करून प्रकाशझोतात येण्याचा प्रयत्न करतात.
बिग बॉसच्या घरातील या धमाकेदार प्रवासानंतर चाहत्यांना फक्त शिव ठाकरे हे नाव “बिग बॉस हिंदी सीझन १६ चा विजेता” म्हणून ऐकण्याची उत्सुकता आहे.