बिग बॉस मराठीचे चौथे पर्व यंदा फारच चर्चेत आहे. मग तो टास्क असो त्यातील सदस्यांचे नाते असो किंवा मग सदस्यांमध्ये असलेले वाद विवाद असो.. घरातील प्रत्येक सदस्य स्वत: ला सिद्ध करण्याच्या प्रयत्नात दिसत आहे. अनेक सदस्यांना टास्कपेक्षा नॉमिनेशनमध्ये येण्याची भीती असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अनेक सदस्य नॉमिनेशनपासून दूर कसे राहता येईल याच्या प्रयत्नात असल्याचे दिसत आहेत.
बिग बॉस मराठीचा हा सिझन दिवसेंदिवस अजूनच रंजक होत चालेला आहे. पहिल्या दिवसापासूनच बिग बॉसने सदस्यांना आश्चर्याचे धक्के द्यायला सुरुवात केली आहे. बिग बॉसच्या घरात याधी स्नेहलता वसईकर हिची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली. आता ‘बिग बॉस’च्या घरात मोठा ट्विस्ट येणार आहे. नवीन चार सदस्यांची ‘बिग बॉस’च्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे.
View this post on Instagram
‘कलर्स मराठी’च्या ऑफिशिअल सोशल मीडियावरुन एक प्रोमो व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये घरात चार वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार असल्याची घोषणा बिग बॉस करताना दिसत आहेत. घरातील सदस्यांचे खरे चेहरे आता कुठे स्पर्धकांना दिसत आहेत. त्यातच आता चार नवीन सदस्यांची घरात एन्ट्री होत असल्याने ‘बिग बॉस’च्या घरातील स्पर्धकांच्या चेहऱ्यावरील रंग उडताना दिसणार आहेत.
‘बिग बॉस मराठी’ चौथ्या पर्वाच्या येणाऱ्या भागात शनिवार व रविवारी चार सदस्य वाइल्ड कार्डद्वारे घरात एन्ट्री घेणार आहेत. बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच चार सदस्य वाइल्ड कार्डमधून घरात प्रवेश करणार आहेत. घरातील सदस्यांसह बिग बॉसने प्रेक्षकांनाही आश्चर्याचा धक्का दिला आहे. वाइल्ड कार्डद्वारे घरात एन्ट्री घेणारे सदस्य कोण असतील याबाबत सदस्यांसह प्रेक्षकांनाही उत्सुकता आहे.
तसेच आता या गेम मध्ये पुढे काय ट्विस्ट येणार आहे हे पाहणे देखील मजेशीर असणार आहे. तसेच या आठवड्यात कोणता सदस्य घराचा निरोप घेणार, याकडे देखील प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.