देश विदेशातील संपूर्ण मराठी रसिक प्रेक्षकांना हास्याचे वेड लावणारा शो म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा.’ अभिनयाने आणि विनोदबुद्धीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री वनिता खरात या शो मधून घरांघरात पोहोचली आहे. तसेच ती सोशल मिडीयावरील तिच्या पोस्टमुळेही कायम चर्चेत असते.
आजवर आपल्या अभिनयाने आणि विनोदाने चर्चेत असलेली अभिनेत्री आता तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. वनिता सध्या फारच खुशीत आहे, त्याचे कारण म्हणजे ती लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
वनिताने काही महिन्यांपूर्वी तिचा बॉयफ्रेंड सुमीत लोंढे याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्या दोघांचा फोटो शेअर करत त्या दोघांच्या नात्याबद्दल जाहीरपणे सांगितले होते. त्यानंतर तिने सण आणि ईतर खास कार्यक्रमांतील त्या दोघांचे खास फोटो अनेकदा शेअर केले आहेत.
त्यामुळे त्यांच लग्न कधी होणार याचीच वाट सर्वजण पाहत असताना तिने अलिकडेच त्यांच्या लग्नाची तारीख सांगितली आहे. वनिता आणि सुमीत येत्या २ फेब्रुवारीला लग्नगाठ बांधणार आहेत. त्याचं लग्न कुठे होणार याबद्दल आतापर्यंत तरी त्यांनी काहीही सांगितलेले नाही.
पण लग्नाला अवघे ११ दिवस बाकी असताना त्यांच्या प्री-वेडिंग फोटोशूटचे फोटो समोर येत आहेत. वनिताने सुमीत सोबतचा लिपलॉकचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे वनिता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.वनिता आणि सुमीत यांच्या या गोड फोटोवर नेटकरी आणि अनेक कलाकार मंडळी शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहे.