महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोचा चेहरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. यंदा मात्र प्राजक्ताने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. यंदाचा तिचा लकडाऊन बी पॉसिटीव्ह, पांडू, पावनखिंड हे चित्रपट तर रानबाजार ही वेबसिरिज चांगलीच लोकप्रिय झाली आहे.
प्राजक्ता कायमच सोशल मिडीयावर सक्रीय असते. त्यामुळे ती प्रेक्षकांना अधिकच जवळची वाटते. तिने तिच्या अभिनयाच्या आणि सौंदर्यतेच्या जोरावर खूप मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी सर्वच चाहते उत्सुक असतात.
प्रसिद्ध सेलिब्रिटी ज्योतिष अनंत पटवा हे अनेक कलाकारांबद्दल विविध भाष्य करीत असतात. असे म्हणतात की, त्यांनी केलेली ही भाष्ये कालांतराने अचूक ठरतात. त्यांनी यावेळी देखील आपल्या लाडक्या अभिनेत्रीबद्दल एक भाष्य केले आहे की, येत्या नवीन वर्षात प्राजक्ता लग्नबंधनात अडकणार आहे. तसेच येणारे नववर्ष हे तिच्यासाठी खूपच शूभ असणार आहे. तर तिला नवनवीन कामे मिळण्याची देखील शक्यता आहे. अन् २०२३ या वर्षात तिचे करिअर एका उंचीवर जाऊन पोहोचणार आहे आणि २३ जानेवारीनंतर तिला अनेक गोष्टींमध्ये फायदा देखील होणार आहे.
तसेच ते पुढे म्हणाले की, प्राजक्ताच्या रखडलेल्या गोष्टीं मार्गी लागणार आहे. तर तिच्या उत्पन्नातही बरीच वाढ होणार आहे. विशेष म्हणजे यावर्षी तिला अनेक पुरस्कारांचेही योग प्राप्त होणार आहे. तर जुलै २०२३ नंतर तिचे वैयक्तिक जीवन फारच चांगले होणार असून गुरुच्या कृपेमुळे प्राजक्ताच्या लग्नाचा योग दिसत आहे. पण तिच्या व्यग्र टाइमटेबलमुळे ती पुढे ढकलणार असल्याचे वाटत आहे.
त्यामुळे आता प्राजक्ता देखील लग्नगाठ बांधणार का ? अन् कोणाबरोबर ? हे जाणून घेण्यासाठी चाहते मात्र प्रचंड उत्सुक आहेत.