झी मराठी वाहिनीवरील होणार सून मी ह्या घरची आणि अग्गंबाई सूनबाई या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान. आतापर्यंत मालिका आणि चित्रपटातून तिने अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. त्यामुळे तिला अभिनयाचा दांडगा अनुभव आहे.
तेजश्री सोशल मीडियावर देखील नेहमी ॲक्टिव असते. तिचे प्रेरणादायी व्हिडिओ चाहत्यांना प्रचंड आवडतात. तसेच ती तिच्या आयुष्यातील खासगी आणि करियर संबंधित अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिने नुकतीच एक पोस्ट केली आहे. त्यामुळे ती आता चर्चेत आली आहे.
तेजश्रीने १२ वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत, जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यामुळे तिचा जुना लूक सुध्दा चाहत्यांना पाहायला मिळाला आहे. तिने तिच्या पोस्ट मधून एक खास गोष्ट सांगितली आहे. ती लवकरच ज्येष्ठ अभिनेत्यासोबत रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.
२०१४ मध्ये तेजश्री ने डॉ. प्रकाश बाबा आमटे या चित्रपटात अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्यासोबत पहिल्यांदाच काम केले होते. तेव्हा तिने तरुण वयातील मंदाकिनी आमटे यांची भूमिका साकारली होती.
तर आज त्याच चित्रपटातील एक फोटो शेअर करत तिने लिहिले की, “१२ वर्षांपूर्वीचा फोटो आणि १२ वर्षांनंतर त्याचं रिक्रेअशन. इतक्या वर्षांनी पुन्हा योग आला. पण तितकंच भारी फिलिंग आहे मोहन काका. आयुष्याच्या प्रवासात अनेक माणसं भेटतात त्यातील काहीच शेवटपर्यंत राहतात. माझ्या पाठिशी कायम असल्याबद्दल तुमचे खूप आभार मोहन काका.”
तेजश्री पुन्हा एकदा डॉ. मोहन आगाशे यांच्यासोबत काम करताना दिसणार आहे. त्यामुळे आता यांचा कोणता नवीन चित्रपट येणार याचीच प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत.