पवित्र रिश्ता या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे. सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जाते. तिने आतापर्यंत तिच्या कामाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत.
अंकिता सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव असते. त्यामुळे ती कायम तिच्या चाहत्यांच्या जवळ असल्याचे भासते. ती तिच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. मागील काही दिवसांपासून तिच्या कामाची नाही तर तिच्या फोटोज् आणि व्हिडिओजमुळेचं ती प्रचंड चर्चेत आहे.
अंकिताचे सर्व चाहते तिला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. परंतू लग्नानंतर तिने सिनेसृष्टीला राम राम ठोकला असा सर्वांचा समज होता. पण आज या सर्व प्रश्नांची उत्तरे अंकिताने दिली आहेत. २०१९ मधील कंगना रनौवतच्या ‘मणिकर्णिका’ या सिनेमात अंकिता मुख्य भूमिकेत दिसली आणि आतापर्यंतचा तिचा हा शेवटचा शेवटचा सिनेमा. त्यांनतर तिने कोणत्याही सिनेमात काम केले नाही.
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत अंकिताने या मागील कारण स्पष्टपणे सांगितले आहे. तेव्हा अंकिताने सांगितले की, “मणिकर्णिका या चित्रपटानंतर माझ्या हातात कोणतीच तलवार आली नाही आणि खरं सांगायचं झालं तर माझा इंडस्ट्रीत कोणी गॉडफादर नाही. मी प्रतिभावान आहे, हे मला माहीत आहे. पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी माझा कोणी गॉडफादर नाही.”
तसेच ती पुढे म्हणाली की, “नकार देण्यासाठी तुमच्याकडे आधी ऑफर्स तर आल्या पाहिजेत. मार्केट आता बरंच बदललं आहे. काहीजण म्हणतात की त्यांना चांगली, मनासारखे ऑफर्स मिळाले नाही म्हणून काम केलं नाही. पण माझ्याबाबत असं काहीच झालं नाही. मला कोणतेच ऑफर्स मिळाले नाहीत, ज्यांना मी नकार करू शकेन. मी समोर जाऊन काम मागू शकत नाही. कारण मी तशी नाही.”
तिच्या या उत्तराने ती पुन्हा एकदा चर्चेत आली असली तरी, दुसरीकडे प्रेक्षक मात्र तिला पुन्हा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.