मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रती दिवस अपघातांमध्ये वाढच होत आहे. त्यात सिनेसृष्टीतील कलाकार, क्रीडा क्षेत्रातील लोकप्रिय खेळाडू आणि मनोरंजन विश्वातील अनेकांचे महामार्गावरील अपघातांचे सत्र सुरूच आहे.नुकतीच दुबईहून परतलेली मराठमोळी अभिनेत्री मीरा जोशी हिचा आज मुंबई पुणे महामार्गावर अपघात झाला.
ती चालवत असलेली मारुती सुझुकी कार दुभाजकावर जोरदार धडकली, त्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात तिच्या कारची मात्र फारच वाईट अवस्था झाली. सुदैवाने मीरा या संकटातून सुखरुप बाहेर पडली.
या अपघातात तिच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. मीराने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत या प्रकाराबद्दल माहिती दिली. तसेच तिने तिच्या गाडीसाठी एक भाऊक पोस्ट देखील शेअर केली. ती फक्त गाडी असली तरी मीराचा मात्र तिच्याच जीव अडकला आहे, हे तिने शेअर केलेल्या पोस्टमधून आपसूक समजत आहे.
View this post on Instagram
मीराने पोस्ट करत लिहिले की, प्रिय सखी, किती आणि कुठे कुठे भटकलो ना आपण दोघी. रात्र, दिवस, ऊन, वारा, पाऊस, चढ-उतार काहीही असो आपण एकमेकींची काळजी घेतली. आज इतका भयंकर अपघात होऊनही तू स्वतःला संपवणं पत्कारलसं आणि मला किरकोळ ओरखडाही येऊ दिला नाहीस. प्रत्येक गोष्टीला शेवट हा असतोच. तब्बल ९० हजारांचा आपला हा प्रवास संपला. गमवलं ना मी तुला.”
या पोस्टवरुन ती तिच्या गाडीला किती जीव लावत होती, हे समजून घेत आहे. तसेच मीरा एकदम सुखरुप आहे याचीही खात्री पटली. तिच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी आणि कलाकार मंडळींनी स्वतःची काळजी घेण्याचा आणि यापुढे गाडी काळजीपूर्वक चालवण्याचा सल्ला दिला.