बॉलिवूड कलाकार हे कायमच काही ना काही कारणाने चर्चेत असतात. त्याचप्रमाणे स्टारकिट असच काहीसं आहे. स्टारकिट असूनही ती बॉलिवूड क्षेत्रापासून चार हात लांबच आहे. नाट्यदिग्दर्शक म्हणून करिअरची सुरुवात केली होती परंतु या क्षेत्रात पदार्पण करण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. तर सध्या अभिनेता आमिर खान यांची मुलगी आयरा खान ही प्रचंड चर्चेत आली आहे. त्याचे कारणही तसेच आहे, आयरा आता सिंगल नाही तिने नुकतंच एका मराठमोळ्या मुलाला लग्नासाठी होकार दिला आहे.
आयरा ही आमिर खान आणि त्यांची पहिली पत्नी रिना दत्ता यांची मुलगी आहे. आयराचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे हा फिटनेस इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे. तो सेलिब्रिटींना फिटनेस ट्रेनिंग देतो. त्याने काही चित्रपटांमध्ये अॅक्शन डायरेक्टर म्हणूनही काम केले आहे. २०२० मध्ये करोना काळात आयरा आणि नुपूर यांनी डेट करायला सुरुवात केली. नुपूर सध्या सुरु असलेल्या ‘आयर्न मॅन इटली’ स्पर्धेमध्ये सहभागी झाला आहे.
View this post on Instagram
या स्पर्धेदरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. नुपूरने गुडघ्यावर बसून आयराला प्रपोझ केले. तेव्हा नुपूरच्या या मागणीला तिने हसत होकार दिला. आणि प्रेक्षकांनीही टाळ्या वाजवत दोघांना शुभेच्छा दिल्या. हा व्हिडिओ आयराने तिच्या स्वताच्या सोशल मीडिया अकाऊंट वरुन शेअर करत तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने “पोपाय : ती होय म्हणाली. आयरा : हीही मी हो म्हणाले”, असे कॅप्शन लिहिले आहे.
या व्हिडिओवर तिच्या अनेक चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय फातिमा सना शेख, सारा तेंडुलकर, हुमा कुरेशी अशा सेलिब्रिटींनीही या दोघांचे अभिनंदन केले आहे. तसेच तिच्या अनेक चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय फातिमा सना शेख, सारा तेंडुलकर, हुमा कुरेशी अशा सेलिब्रिटींनीही या दोघांचे अभिनंदन केले आहे.