बॉलिवूड सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेता शाहरुख खान हा जगप्रसिध्द अभिनेता आहे. शाहरुखचे जगभरात अनेक चाहते आहेत. बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री मध्ये शाहरुखने त्याच्या अभिनयाने, हटके स्टाइलने जबरदस्त छाप पाडली आहे. अभिनय क्षेत्रात त्याला आदर्श मानणारे देखील अनेक चाहते आहेत. त्याचप्रमाणे मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख हा सुद्धा शाहरुखचा चाहता आहे.
सध्या रितेश त्याच्या आगामी चित्रपटाच्या कामात गुंतलेला आहे. रितेश आणि तमन्ना भाटिया पहिल्यांदाच रोमँटिक कॉमेडी चित्रपट “बबली बाउन्सर” मध्ये स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शशांक घोष यांनी केले आहे. हा चित्रपट येत्या २३ सप्टेंबर २०२२ रोजी डिझ्नी प्लस हॉटस्टावर प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
यादरम्यान रितेश आणि तमन्ना यांचा गप्पा मारत असतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यावेळी रितेशने शाहरुख सोबतच्या पहिल्या भेटीचा प्रसंग सांगितला आहे. त्यांची ही पहिली भेट अविस्मरणीय होती. कारण या भेटीतूनचं शाहरुख ची ती एक सवय रितेशला लागली होती.
रितेश आणि तमन्नाचा हा व्हिडीओ नेटफ्लिक्सने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. त्यात रितेश असं म्हणाला की,“शाहरुख खान माझ्या वडिलांना म्हणजेच विलासराव देशमुख यांना भेटण्यासाठी आले होते, तेव्हा त्यांना माझ्या घरी पाहून मला खूप आनंद झाला होता. कारण मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे. शाहरुखला भेटल्यानंतर मी त्यांना काय घेणार (चहा, कॉफी) अशी विचारणा केली. त्यावर शाहरुखने काहीच घेणार नसल्याचं म्हटलं. मात्र मी थोडा आग्रह केल्यानंतर शाहरुखने ब्लॅक कॉफी घेणार असल्याचं सांगितलं. त्यावेळी पहिल्यांदाच ब्लॅक कॉफी काय असते, ते मला शाहरुखमुळे कळलं.”
तसेच तो पुढे म्हणाला की,“जेव्हा शाहरुखने माझ्याकडे ब्लॅक कॉफी मागितली तेव्हा मी माझ्या शेफकडे गेलो आणि त्याला ब्लॅक कॉफी बनवण्यास सांगितलं, पण त्यालाही याबद्दल माहिती नव्हती. यानंतर त्याने कोणाच्या तरी मदतीने शाहरुखसाठी ब्लॅक कॉफी बनवली. मला ब्लॅक कॉफीबद्दल खूप उशीरा कळलं आणि मग मी ती प्यायला सुरुवात केली. आता ब्लॅक कॉफीशी माझं नातं अफेअरसारखं झालंय.”